Short News

त्या महिलेला आपल्या मुलांनाही आयसिसचे दहशतवादी बनवायचं

त्या महिलेला आपल्या मुलांनाही आयसिसचे दहशतवादी बनवायचं

आयसिसच्या दहशतवाद्याशी लग्न केलेली मुळची बांगलादेशी महिला झोयानं, आपल्या मुलांनादेखील आयसिसचा दहशतवादी बनवायचं एकेकाळचं स्वप्न असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. झोयानं अमेरिकेत राहणाऱ्या जॉन जॉर्जेलसशी २००४ मध्ये लग्न केलं. जॉन इस्लाम धर्म स्विकारून आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाला. अमेरिकन वायुदलात जॉनचे वडिल डॉक्टर होते. जॉननं अमेरिकेतील टेक्सास विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी आपल्या ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. 'यासिर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसहूद अझहर याचा उजवा हात मानला जायचा.  
दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन पहिले नेते

दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन पहिले नेते

उद्या आशिया आणि पर्यायाने जागतिक शांततेच्या दिशेने नवे पाऊल टाकणार आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची अणूकार्यक्रमासह इतर अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. 1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उ.कोरियन नेते असतील. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि  किम यांची सकाळी स्थानिकवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता भेट होणार आहे. 
आजच्या दिवशीच चंद्रावर उतरले होते अमेरिकेचे यान

आजच्या दिवशीच चंद्रावर उतरले होते अमेरिकेचे यान

इतिहासात 26 एप्रिलची तारखेला अनेक कारणांनी महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय गणिततज्ञ रामानुजन यांचे निधन आणि रुस मधील चेरनोबिल परमाणूची घटना यांचा समावेश आहे. तसेच हा दिवस अमेरिकेच्या अंतराळच्या इतिहासासाठीही महत्तवपुर्ण आहे. यादिवशीच अमेरिकेचे एक अंतराळ यान चंद्रावर उतरले होते. देश आणि जगातील ही एक महत्त्वाची घटना 26 एप्रिल रोजी झाली होती.