Short News

भारताने मालदीवमध्ये हस्तक्षेप केल्यास चीन शांत नाही बसणार

भारताने मालदीवमध्ये हस्तक्षेप केल्यास चीन शांत नाही बसणार

मालदीवमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर सध्या भारताजवळ फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कोणताही उपाय नाही. परंतु भारताच्या भूमिकेवर चीन बारीक लक्ष ठेवून आहे. भारताला मालदीवपासून दूर राहण्याचा सल्ला देणाऱ्या चीनने आता भारताला गंभीर इशारा दिला आहे. भारताने मालदीवमध्ये लष्करी कारवाई केल्यास चीन त्यांना रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलेल, असे चीनने सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमधून छापले आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या शहरातील 34 मराठी शाळांना कुलूप

मुख्यमंत्र्यांच्या शहरातील 34 मराठी शाळांना कुलूप

मराठी भाषेचे संरक्षण व्हावे आणि विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.पण असे असतानाही खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात विद्यार्थ्यांअभावी तब्बल 34मराठी शाळा बंद झाल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेचे शिक्षण सभापती दिलीप दिवे यांनी सुद्धा ही बाब मान्य केली आहे. खालावलेला शिक्षणाचा दर्जा आणि इंग्रजी शाळांकडे पालकांचा वाढलेला कल यामुळे या शाळा बंद झाल्या.   
लैंगिक छळापासून महिलेला वाचवण्यासाठी धावला 'शिवाजी'

लैंगिक छळापासून महिलेला वाचवण्यासाठी धावला 'शिवाजी'

रेल्वे सुरक्षा बलातील एका संवेदशनील कॉन्स्टेबलने, 25 वर्षीय महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. महिलेला वाचविण्यासाठी त्याने धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. ही घटना चेन्नईत घडली आहे. के.शिवाजी असे त्याचे नाव असून त्याने केलेला पराक्रम नावाला शोभणारा आहे. एमआरटीएस ट्रेनमधून वेलाचेरी ते चेन्नई बीच प्रवासादरम्यान त्यांनी एका महिलेला बलात्कारापासून वाचवत, आरोपीला अटक केली आहे. 
पंचायत निवडणुकीच्या उमेदवारांचे अर्ज भरले चक्क व्हॉट्सअॅपवरून

पंचायत निवडणुकीच्या उमेदवारांचे अर्ज भरले चक्क व्हॉट्सअॅपवरून

माहितीच्या देवाण घेवाणीसाठी व्हॉट्स अॅपचा वापर सर्रासपणे होऊ लागला आहे. मात्र आता व्हॉट्स अॅपचा अजून एक वापर समोर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकीसाठी 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज चक्क व्हॉट्स अॅपवरून भरल्याचे समोर आले. दरम्यान कलकत्ता उच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅपवर नामांकन भरलेल्या नऊ अपक्ष उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यास राज्य निवडणूक आयोगाला सांगितले.