‘आवारा हूं...’ गाण्यावर थिरकली चीनी पावले
विदेश
- 2 month, 7 days ago
भारताच्या बुद्धाने चीनला बोधीसुक्तात गुंफले. दोन्ही देशांमधील आध्यात्मिक बंध तेव्हापासूनचा. बुद्धानंतर चीनी जनमानसावर मोहिनी आहे राज कपूर यांची. ‘आवारा' राज कपूर आजही चीनी माणसाच्या स्मृतीत आहेत. चीनी नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडची मोठीच छाप दिसली. दूतावासातील चीनी कर्मचारी महिलेने ‘आँखे खुली हो या हो बंद...' हे गीत सादर केले. गायिकेसोबत कलाकारांची पावले थिरकत होती.