Short News

सौदी अरेबियात दोन भारतीयांकडून उकळले 10 कोटी

सौदी अरेबियात दोन भारतीयांकडून उकळले 10 कोटी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीने सौदी अरेबियात गेलेल्या गुजरातमधील दोघा व्यावसायिकांना धमकावले आहे. त्यांच्याकडून तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी उकळली असल्याची माहिती मिळाली आहे. कन्सस्ट्रक्शन व्यवसायाशी संबंधित असलेले हे दोघेजण उमराह तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले होते. गुजरातच्या वालेड शहरात दोघांचाही कन्सस्ट्रक्शनचा मोठा व्यवसाय आहे. 
पाच कोटी लोकांनी बंद केली ई-शॉपिंग

पाच कोटी लोकांनी बंद केली ई-शॉपिंग

देशातल्या ई-कॉमर्स कंपन्या सध्या अडचणीत सापडल्या आहेत. सुमारे पाच कोटी लोक ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून नियमितपणे ऑनलाइन शॉपिंग करतात, पण दुसरीकडे गेल्या वर्षभरात इतक्याच म्हणजे 5 कोटी लोकांनी ऑनलाइन शॉपिंग करणं बंद केले आहे. यामुळे कंपन्यांना 50 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. गुगलची कन्स्लटंट बेन अँड कंपनी आणि फिलँथ्रॉपिक व्हेंचर फंड ओमिड्यार नेटवर्सने अभ्यास करून हे टि्वस्ट समोर आणले . 
स्मिता गोंदकरचा नवा अल्बम 'लाजरान साजरा'

स्मिता गोंदकरचा नवा अल्बम 'लाजरान साजरा'

अभिनेत्री स्मिता गोंदकर ती नव्या गाण्यातून प्रेक्षकांना भेटणार आहे.  बिग बॉस मराठीच्या अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे स्मिता चर्चेत आली होती. सहा फायनलिस्टमध्ये पोहोचूनही तिला यशाने हुलकावणी दिली. मात्र बिग बॉसमधून बाहेर येताच तिने जोरदार सेलिब्रेशही केले. त्यानंतर व्हिडिओ पॅलेसने तिला नव्या गाण्याची ऑफर दिली. आगामी 'लाजरान साजरा' या गाण्यातील तिचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला. 
बटलरचे शतक, स्टोक्सचे अर्धशतक; मोठ्या भागीदारीकडे वाटचाल

बटलरचे शतक, स्टोक्सचे अर्धशतक; मोठ्या भागीदारीकडे वाटचाल

भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा आज चाैथा दिवस असून इंग्लंडपुढे विजयासाठी एकूण ५२१ धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान आज दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या सत्रात ४ गडी गमावले. सलामीवीर जेनिंग्स, अॅलिस्टर कुक, कर्णधार जो रूट आणि नवोदित ओली पोप यांना तंबूत परतावे लागले. पण दुसऱ्या सत्रात इंग्लंडने पूर्ण वर्चस्व राखले. जोस बटलरने झुंजार शतक केले, तर स्टोक्सने अर्धशतक करत त्याला उत्तम साथ दिली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more