Short News

हर्ले-डेव्हिडसनच्या करावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संतापले

हर्ले-डेव्हिडसनच्या करावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संतापले

जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींच्या आयातीवर भारत सरकारने लावलेल्या करावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. भारतीय मोटारसायकलींच्या आयातीवरही अमेरिकेत कर लावण्याचा इशारा दिला आहे. भारताने सरकारने महागड्या दुचाकीवरील आयात कर कमी केला आहे. तरीही ट्रम्प यांचे समाधान झालेले नाही असे ट्रम्प यांनी सांगितले. 
व्हॉट्सअॅपच्या मेसेज डिलेट करताना सावधानता बाळगा

व्हॉट्सअॅपच्या मेसेज डिलेट करताना सावधानता बाळगा

व्हॉट्सअॅपचे 'Delete For Everyone' या फीचरबाबत नवी माहिती समोर आली आहे. कीच्या व्यक्तीला मेसेज गेल्यानंतर सात मिनिटांच्या आत तो डिलीट करता येतो. अशा मेसेजच्या जागी डिलीटेड मेसेज असे दिसते. परंतु तुम्ही मेसेज डिलीट करण्यापूर्वी एखाद्या युझरने त्याला कोट करुन रिप्लाय दिलेला असेल तर तो दिसत राहिल.
गुलाबजामचे वेगवेगळे प्रकार पाहून अभिनेता सिद्धार्थ भारावला

गुलाबजामचे वेगवेगळे प्रकार पाहून अभिनेता सिद्धार्थ भारावला

मराठी चित्रपट गुलाबजाम चित्रपटाच्या प्रमोशनात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी व्यस्त आहेत. या दरम्यान त्यांनी आयटीएम इन्स्टिटयूट मध्ये एलिमेंट २०१८ या खाद्यस्पर्धेवेळी हजेरी लावली. "गुलाबजाम" याच संकल्पनेअंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात हॉटेल मॅनेजमेंट शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी पण ७५ पेक्षा जास्त वेगवेगळ्या चवीचे गुलाबजाम तयार केले. 
प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्नील आणतोय 'मी पण सचिन'

प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्नील आणतोय 'मी पण सचिन'

क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर आदर्श व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे.अशा या सर्व होतकरू तरुणांचे नेतृत्व करणारा सिनेमा लवकरच मराठीच्या मोठ्या पडद्यावर येत आहे.'मी पण सचिन' असे या सिनेमाचे नाव आहे.या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर फर्स्ट लुक रिलीज केला. स्वप्नील जोशीने यात प्रमुख भुमिका साकारली आहे.