Short News

बापरे ! जगातील ११ शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई

बापरे ! जगातील ११ शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई

जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड टंचाई होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे.दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पृथ्वीचा ७०टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरी त्यापैकी ३ टक्केच पाणी पिण्याच्या योग्यतेचे आहे. जगभरातील १अब्ज लोकांना पिण्याचे पाणी मिळविण्यास खूपच कष्ट करावे लागतात. 
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या माजी आमदार कमल देसाई यांचे गोरेगाव येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या. कमल देसाई ह्या आणीबाणीच्या काळात तरुंगात होत्या. त्यांनी मृणाल गोरे यांच्यासह अनेक आंदोलनात सहभाग घेतला. गोरगरीबांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केले.