Short News

युजरच्या माऊस अन्  की-बॉर्डच्या हालचालीवर असते फेसबुकची नजर

युजरच्या माऊस अन् की-बॉर्डच्या हालचालीवर असते फेसबुकची नजर

केंब्रिज अॅनालिटिका' डेटा लिक प्रकरणानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांना फेसबुकने अमेरिकेच्या सीनेटमध्ये उत्तरे दिली. यामध्ये, युजरची खासगी माहिती, त्याची आवड-निवड जाणून घेण्यासाठी त्याच्या कॅम्प्युटरच्या की-बोर्ड आणि माऊसच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते अशी कबुली फेसबुकने दिली आहे. युजर कोणत्या प्रकारच्या गोष्टींवर जास्त वेळ घालवतो, कोणत्या कंटेंटवर किती वेळ थांबतो याची माहिती फेसबुक घेते. 
प्लास्टिक वापरणाऱ्यांवर राज्यभरात कारवाई

प्लास्टिक वापरणाऱ्यांवर राज्यभरात कारवाई

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात आहे. पुण्यात महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून 73 कारवाया करत तीन लाख 69 हजार रुपयांची वसुली केली. सांगलीतही प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानावर महापालिकेने छापे टाकून हजारो रुपयांचा प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक कारवाई सुरू केली. 
'यो-यो' पास करणाऱ्यालाच संघात प्रवेश: शास्त्री

'यो-यो' पास करणाऱ्यालाच संघात प्रवेश: शास्त्री

भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी भारतीय संघात निवड होण्यासाठी यो-यो चाचणी अनिवार्य असण्याबद्दल टीका केली असली तरी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा या चाचणीला पूर्ण पाठिंबा आहे. ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री यांनी या मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त केले.
सनी लिओनीला पोटदुखीचा त्रास; रुग्णालयात दाखल

सनी लिओनीला पोटदुखीचा त्रास; रुग्णालयात दाखल

सनी लिओनी सध्या पोटदुखीनं त्रस्त आहे. उपचारासाठी तिला उत्तराखंड येथील उधमसिंह नगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तराखंड इथं 'स्प्लिट्स व्हिला' या रिअॅलिटी शोचं शूटिंग करताना तिला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळं तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more