Short News

प्लोरिडामधील शाळेत गोळीबार, १७ जणांचा मृत्यू

प्लोरिडामधील शाळेत गोळीबार, १७ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांत असलेल्या पार्कलॅन्डमधील एका शाळेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जवळपास १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. फ्लोरिडामधील पार्कलॅन्ड येथील स्टोनमॅन डगलस शाळेत बुधवारी हा गोळीबार झाला. या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळीबार करणा-या संशयित आरोपीला पोलिसांना अटक केली आहे.
प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांचे निधन

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांचे निधन

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा राहुल आणि संध्या, अलका, वर्षा या ३मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बाणगंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. गोयल यांना सकाळी सव्वादहाच्या दरम्यान त्रास होऊ लागला आणि ते घरातच कोसळले.
रितेश देशमुखने घेतली मोदीची फिरकी

रितेश देशमुखने घेतली मोदीची फिरकी

सध्या संपूर्ण देशभरात डायमंड व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅँकेत केलेल्या ११,५०० कोटी रूपयांच्या महाघोटाळ्याचीच चर्चा रंगत आहे. यास बॉलिवूडदेखील अपवाद नाही. नुकतेच अभिनेता रितेश देशमुख याने नीरव मोदीची फिरकी घेताना एक ट्विट केले. रितेशने त्याच्या ‘बॅँक चोर' या चित्रपटाचा एक फोटो शेअर करताना ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी एकटाच असा ‘बॅँक चोर' आहे जो अपयशी ठरला आहे.'
बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात

बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.