Short News

इंडोनेशियान जहाज समुद्रात उलटले;  13 जणांचा बुडून मृत्यू

इंडोनेशियान जहाज समुद्रात उलटले; 13 जणांचा बुडून मृत्यू

इंडोनेशियन आईसलॅण्ड सुलावेसी येथे समुद्रातील प्रवासी जहाज पलटल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रमजान महिना संपत आल्याने ईदचा सण साजरा करण्यासाठी काही पर्यटक प्रवासी जहाजावर आले होते. यावेळी प्रवाशांची मोठी गर्दी झाल्यामुळे जहाजाचा तोल गेल्याने जहाज पलटी झाली. दक्षिण सुलावेसी प्रांताची राजधानी असणाऱ्या मकस्सर शहराच्या किनाऱ्यावरून या जहाजाने प्रवासाला सुरुवात केली होती.
Football Worldcup : एका गोलाच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय

Football Worldcup : एका गोलाच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय

ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालने मोरॅक्कोवर 1-0 असा विजय मिळवला. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकातील पोर्तुगालचा हा पहिला विजय ठरला. कारण पहिल्या सामन्यात पोर्तुगालने स्पेनबरोबर 3-3 अशी बरोबरी साधील होती. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला पोर्तुगालला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर अप्रतिम हेडर लगावत रोनाल्डोने संघासाठी पहिल्या सत्रातील एकमेव गोल केला. 
स्वातंत्रदिनी येतोय जॉनचा 'सत्यमेव जयते' सिनेमा

स्वातंत्रदिनी येतोय जॉनचा 'सत्यमेव जयते' सिनेमा

जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यमेव जयते' हा नवा लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे. जॉनच्या या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. मिलाप मिलान झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते' हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. "या स्वातंत्र्यदिनी, न्याय मिळणार," असे म्हणत चित्रपटाचे पहिले पोस्टर जॉनने ट्विटवर शेअर केले आहे. 
लातूरमध्ये वाढू लागली जातीय विषमता, 24 कुटुंबांचे स्थालांतर

लातूरमध्ये वाढू लागली जातीय विषमता, 24 कुटुंबांचे स्थालांतर

एका घटनेतून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या रुद्रवाडी या छोट्याशा गावात मोठा वाद निर्माण झाला. यामुळे गावातील 24 कुटुंबांना गाव सोडावे लागले. या घटनेला वैयक्तिक, जातीय, राजकीय असे सर्वच पैलू आहेत. मात्र यातून निर्माण झालेला सामाजिक प्रश्न आता गंभीर झाला आहे. घटनेच्या निषेधार्थ लातूर बंद ठेवण्याचा आज प्रयत्न करण्यात आला.  
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more