Short News

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ‘टीटीपी’ संघटनेचा उपप्रमुख खालिद मेहसूद ठार

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ‘टीटीपी’ संघटनेचा उपप्रमुख खालिद मेहसूद ठार

पाकिस्तानच्या ईशान्य भागात अमेरिकेने ८ फेब्रुवारीला केलेल्या ड्रोन हल्ल्यात तेहरिक-ई-तालिबान पाकिस्तान या संटनेचा उपप्रमुख खालिद मेहसूद ऊर्फ मारला गेला आहे. या वृत्ताला या संघटनेने सोमवारी दुजोरा दिला. तालिबानचा प्रमुख मुल्ला फझलुल्ला याने कमांडर मुफ्ती नूर वली याला त्याचा नवा उपप्रमुख म्हणून नियुक्त केले असल्याचीही माहिती त्याने दिली. सजना हा तालिबानचा प्रमुख नेता होता.
चीनच्या 'त्या' महत्त्वकांक्षी प्रकल्पाला भारताचा परत नकार

चीनच्या 'त्या' महत्त्वकांक्षी प्रकल्पाला भारताचा परत नकार

चीनचा महत्त्वकांक्षी वन बेल्ट वन रोडच्या प्रकल्पाविषयी भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला असून भारताने परत एकदा नकार दिला. शंघाय को-ऑपरेशन ऑर्गेनाइजेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सुषमा स्वराज्य यांनी भारत या प्रकल्पाचा भागीदार बनणार नसल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा याच आठवड्यात चीन दौरा असून भारताच्या या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. 
दारुण पराभवानंतर रोहित फलंदाजांवर संतापला

दारुण पराभवानंतर रोहित फलंदाजांवर संतापला

आयपीएलच्या 11व्या हंगामात मुंबईची हाराकिरी सुरुच आहे. मुंबईला  हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी कमी धावांचे लक्ष्य असतानाही मुंबईला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. या पराभवामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा निराश झाला आहे. त्याने या पराभवाचे खापर मुंबईच्या फलंदाजांवर फोडले. आम्ही या पराभवासाठी स्वत:ला दोषी ठरवू. आमच्या फलंदाजांनी पुन्हा वाईट कामगिरी केल्याचे रोहित म्हणाला. 
आसाराम ठरला दोषी; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

आसाराम ठरला दोषी; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी आसारामसह तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. तर दोन जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. जोधपूर सेंट्रल जेलमध्ये विशेष कोर्टरुम तयार करण्यात आले आहे. जोधपूर एससी-एसटी कोर्टचे जज मधुसूदन शर्मा यांनी जेलमधील कोर्टरुममध्ये हा निर्णय दिला. न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर गेल्या ५ वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.