Short News

मालदीव आणीबाणी : लष्कराने खासदारांना संसदेत जाण्यास रोखले

मालदीव आणीबाणी : लष्कराने खासदारांना संसदेत जाण्यास रोखले

मालदीवच्या लष्कराने मंगळवारी खासदारांना संसदेत जाण्यापासून रोखले. मागच्या आठवड्यापासून राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी मालदीवमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. शनिवारी यामीन यांनी युरोपिअन युनियनच्या जर्मनी आणि युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांना भेटण्यास नकार दिला होता. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाचे उच्चायुक्त झैद राज अल हुसैन यांनीही मालदीवमधल्या आणीबाणीवर टीका केली होती. 
अमृता खानविलकरची रणवीर सिंगसोबत खलीबली

अमृता खानविलकरची रणवीर सिंगसोबत खलीबली

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने रणवीर सिंगसोबत खलीबली गाण्यावर जबरदस्त डान्स केला. रणवीर सिंग मॅगनिट महाराष्ट्र कॉनव्हेगन्स 2018 प्रोगॅममध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाला होता. यादरम्यान दोघांनी एकत्र डान्स केला. अमृताने या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भव्य शिवजयंती सोहळा

दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भव्य शिवजयंती सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जंगी कार्यक्रम आज राजधानी दिल्लीत होत आहे. त्यासाठी देशभरातून हजारो शिवप्रेमी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लष्करप्रमुख बिपीन रावत यांची हजेरी असणार आहे. महाराष्ट्र सदनातून शिवजन्मोत्सव सोहळा आणि शाहिरी कार्यक्रमाने शिवजयंती कार्यक्रमाची सुरुवात होईल.
फ्लोरिडा शाळेत गोळीबाराच्यावेळी भारतीय महिलेमुळे वाचले अनेक मुलांचे जीव

फ्लोरिडा शाळेत गोळीबाराच्यावेळी भारतीय महिलेमुळे वाचले अनेक मुलांचे जीव

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी माजी विद्यार्थ्याने फ्लोरिडा शाळेत गोळीबार केला. यामध्ये 17लोकांनी आपला जीव गमावला. अचानक केलेल्या गोळीबारामुळे अनेक लोकं गोंधळले. मात्र शाळेत उपस्थित असलेल्या एका शिक्षिकेच्या प्रसंगावधानामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव वाचलेत. या शिक्षिकेचं सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. शांती विश्वनाथन असं या शिक्षिकेचं नाव असून या शिक्षिकेचे अनेक पालक आभार मानत असून त्यांचीच चर्चा.