Short News

पॅडमॅन चित्रपटावर बंदी घातल्याने पाकिस्तानमधील महिलांचा संताप ; सेन्सॉर बोर्डला सुनावले

पॅडमॅन चित्रपटावर बंदी घातल्याने पाकिस्तानमधील महिलांचा संताप ; सेन्सॉर बोर्डला सुनावले

आर बल्की दिग्दर्शित 'पॅडमॅन' चित्रपटात मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनवर खुलेपणाने भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाला भारतात मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घातली आहे. पॅडमॅन चित्रपटावर बंदी घातल्याने पाकिस्तानमधील महिलांनी मात्र नाराजी व्यक्त केली.महिलांनी फेडरल सेन्सॉर बोर्डावर टीका करत आम्हालाही मासिक पाळी येते अशा शब्दांत सुनावले. 
BMW G310 आणि G310 GS बुकिंग सुरू

BMW G310 आणि G310 GS बुकिंग सुरू

भारतात BMW च्या दमदार बाईक्स G310 आणि G310 GS ची बुकिंग डिलर लोकांनी सुरु केली आहे. या बाईक्सची बुकिंग किंमत 50 हजार रुपयांपासून सुरू आहे. दरम्यान कंपनीने या दोन्ही बाईक्सच्या उपलब्धतेविषयी कोणतीच माहिती दिलेली नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार BMW G310 ची किंमत 3 लाख रुपये आणि BMW G310 GS ची किंमत 3.5 रुपये असू शकते. कंपनीने 2018 च्या ऑटो एक्सपोत या दोन्ही बाईक्स सादर केल्या होत्या. 
'आश्‍चर्य फ**इट' मधील लूकसाठी प्रियंकाने खर्च केले सोळा तास

'आश्‍चर्य फ**इट' मधील लूकसाठी प्रियंकाने खर्च केले सोळा तास

ऑस्ट्रेलियन चित्रपट 'लॉयन'मध्ये एक वयस्कर आई व 'हाफ तिकीट' या मराठी चित्रपटातील आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियंका बोस एका नव्या भूमिका साकरत आहे. 'आश्‍चर्य फ**इट' सिनेमात बोल्ड व तरुण वेश्‍येच्या भूमिकेत दिसणार आहे. लेखक सादत हसन मंटो यांच्या कथेतून प्रेरणा हा सिनेमा घेऊन बनविण्यात आला आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी मला सोळा तास लूकसाठी खर्च करावे लागले. 
मोदी सरकारच्या काळात भारत चीनवर भारी

मोदी सरकारच्या काळात भारत चीनवर भारी

जरी भारताचे जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण जास्त असले तरी भारत सरकार चांगले धोरण आखत आहे. याचे प्रशस्तीपत्रक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिले आहे. भारत सरकारच्या डोक्यावर असलेले कर्ज जीडीपीच्या 70 टक्के आहे. परंतु भारत सरकार योग्य धोरणे आखत असून नजीकच्या काळात हे प्रमाण कमी होईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सहसंचालक अब्देल सेनहादजी यांनी व्यक्त केला आहे.