Short News

शिख भाविकांना भेटण्यापासून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकने रोखले

शिख भाविकांना भेटण्यापासून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकने रोखले

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानात असलेल्या शिख भाविकांना भेटण्यास रोखले. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जवळपास 1800 शिख भाविकांचा एक समूह 12 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या यात्रेवर गेला होता. यातील काही भाविकांना भेटण्यासाठी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. 
सत्तेसाठी मिझोरममध्ये कट्टर विरोधक भाजपा-काँग्रेस एकत्र

सत्तेसाठी मिझोरममध्ये कट्टर विरोधक भाजपा-काँग्रेस एकत्र

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप व काँग्रेस मिझोरममध्ये एकत्र आले आहेत. मिझोरममधील चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजप-काँग्रेसने हातमिळवणी केली. 20 जागांपैकी काँग्रेसला 6 तर भाजपला 5 जागा मिळाल्या आहेत. तर मिझो नॅशनल फ्रंटने 8 जागा मिळवल्या. निकालानंतर काँग्रेस व भाजपने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री व काँग्रेस नेते झोडिंतुलंगा यांनी दिली. 
'या' फलंदाजाने मारला या सत्रातील सर्वात लांब  षटकार

'या' फलंदाजाने मारला या सत्रातील सर्वात लांब षटकार

एबी डेविलियर्स आणि क्विंटन डी कॉक यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर बंगळूरुने चेन्नईविरुद्ध सामन्यात 205 धावा केल्या. डेविलियर्सने 30 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने ६८ धावा केल्या. डिविलियर्सने ठाकूरच्या गोलंदाजीवर सलग 3 षटकार ठोकले. यातील एक तब्बल 111मीटर लांब गेला. यंदाच्या आयपीएलमधील हा सर्वात लांब षटकार आहे. चेंडू स्टेडियमच्या बाहेर निघून गेल्याने अंपायरने नवा चेंडू मागवला. 
धवन आणि स्मृती मानधनाची अर्जुन पुरस्कारासाठी तर कोहलीची खेलरत्नसाठी   शिफारस

धवन आणि स्मृती मानधनाची अर्जुन पुरस्कारासाठी तर कोहलीची खेलरत्नसाठी शिफारस

बीसीसीआयने सलामीचा शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या नावाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने विराट कोहलीची शिफारस केली आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी ही माहिती दिली. शिखर धवन हा तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळणारा टीम इंडियाचा नियमित सलामीचा फलंदाज आहे.