Short News

'या' देशाने तृतीयपंथीयांसाठी सुरू केली शाळा

'या' देशाने तृतीयपंथीयांसाठी सुरू केली शाळा

तृतीयपंथी म्हटले की उपेक्षा हे जणू समिकरणच. शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला येत नाहीत. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाकिस्तान एक पाऊल उचलले आहे. पाकिस्तानामध्ये तृतीयपंथीयासांठी पहिली शाळा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशनचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेचा गोंधळ; श्रीलंकेच्या अध्यक्षांना म्हटलं मोदी

बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेचा गोंधळ; श्रीलंकेच्या अध्यक्षांना म्हटलं मोदी

बीबीसीच्या एका वृत्तनिवेदिकेचा राष्ट्रकुल बैठकीचे वृत्तनिवेदन करताना गोंधळ उडाला. यामुळे बीबीसीला माफी मागावी लागली. राष्ट्रकुल प्रमुखांचे थेट प्रक्षेपण सुरू असताना बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेने श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांना पंतप्रधान मोदी म्हटले. सिरिसेना बकिंगघम पॅलेसच्या प्रवेशद्वारासमोर गाडीतून बाहेर पडत असताना वृत्तनिवेदिकेने चूक केली.  
मार्केटयार्ड परिसरात आंबेडकर नगर झोपडपट्टीत आग

मार्केटयार्ड परिसरात आंबेडकर नगर झोपडपट्टीत आग

मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमनचे मुख्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे सुमारे 200 कर्मचारी नागरिकांसह आग विझवण्याचे अथक प्रयत्न करत आहेत. तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागून 50 ते 60 झोपडपट्ट्या आगीत भस्मसात झाल्या. 
आमिर खानने पाहिला नाही शाहरुख खानचा 'स्वदेश'

आमिर खानने पाहिला नाही शाहरुख खानचा 'स्वदेश'

 शाहरुख खानचा सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आजही अनेकांना चांगलाच लक्षात आहे. मात्र हा बहुचर्चित चित्रपट पाहिलाच नसल्याचे वक्तव्य आमिर खानने केले आहे. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यांत यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमिर बोलत होता. पानी फाऊंडेशनची प्रेरणा ‘स्वदेस' या चित्रपटातून मिळाली का,असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.