Short News

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हाकिंग यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्णय योगदान दिले. 
डोकलाममध्ये चीन पुन्हा बनवतोय रस्ता

डोकलाममध्ये चीन पुन्हा बनवतोय रस्ता

डोकलाममध्ये चीनने परत आपल्या हालचाली वाढल्या असून हे भारतासाठी धोकेदायक आहे. चीनचे सैन्य पीएलए या भागात परत रस्ता तयार करत असून सैन्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधांची जुळवाजुळव करत आहे. येथील 4 किमीच्या अंतरावर असलेल्या भारतीय सैन्याच्या चौकी पर्यंत 1.3 किमीचा चीन रस्ता बनवत आहे. यामुळे चीनच्या सैन्य डोकलाम जाम्फेरी रिजपर्यंत सहज पोहोचवू शकते. 
आयडियाची 'निर्वाणा' पोस्टपेड प्लानसह कॅशबॅक ऑफर

आयडियाची 'निर्वाणा' पोस्टपेड प्लानसह कॅशबॅक ऑफर

आयडिया सेल्युलरने आपल्या ग्राहकांसाठी नवा 'निर्वाणा' हा पोस्टपेड प्लान आणला आहे. या प्लानमध्ये आडिया ग्राहकांना अनलिमिटेड कॉल, डेटा कॅरी फॉरवर्ड बरोबर नॉनस्टॉप इंटरनेट, एश्योर्ड डिव्हाईस सिक्युरिटी असणार आहे. याशिवाय ग्राहक पुर्ण भारतभर निशुल्क रोमिंग, आईएसडी, आणि प्रायरिटी सेवेचा लाभ घेऊ शकणार आहे. तसेच ग्राहकांना नवे 4जी हॅण्डसेटवर 2 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर देत आहे.
एका दिवसात मार्क झुकरबर्गने गमावले 6 अब्ज डॉलर

एका दिवसात मार्क झुकरबर्गने गमावले 6 अब्ज डॉलर

'डेटा लीक' प्रकरणानंतर फेसबुकला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेची सोशल प्लॅटफॉर्मवर असलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक घट नोंदवण्यात आली आहे. या पडलेल्या किंमतीमुळे फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्गला एका दिवसात 6.06 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 395 अरब रुपयांचा फटका बसला आहे. यानंतर अमेरिका आणि युरोपीय अधिकाऱ्यांनीही फेसबुककडे स्पष्टीकरण मागितले आहे.