Short News

सीरियावर पुन्हा हल्ले केले तर समीकरणे बदलतील - रशिया

सीरियावर पुन्हा हल्ले केले तर समीकरणे बदलतील - रशिया

'पाश्‍चिमात्य देशांनी सीरियावर पुन्हा हल्ले केले, तर जागतिक समीकरणे पूर्णत: बदलून जातील', असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रविवारी दिला. रासायनिक शस्त्रांच्या वापराच्या आरोपावरून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने गेल्या आठवड्यात सीरियावर हवाई हल्ले केले होते. रशिया आणि इराण या दोन देशांचा या कारवाईला विरोध आहे. यासंदर्भात रशियाने अधिकृत पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली. 
सरकारला मोबाईलशी आधार क्रमांक जोडण्याचे आदेश नव्हतेच: सुप्रीम कोर्ट

सरकारला मोबाईलशी आधार क्रमांक जोडण्याचे आदेश नव्हतेच: सुप्रीम कोर्ट

आधार प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्वपूर्ण खुलासा केला. न्यायालयाने सरकारला कधीही मोबाईलशी आधार क्रमांक जोडण्यास सांगितले नव्हते. गेल्या काही काळापासून बँकिंगसह सर्वच क्षेत्रांकडून आपल्या ग्राहकांना आधार आणि मोबाईल क्रमांक जोडण्याबाबत दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी महत्वाची मानली जात आहे. 
राज्यातील धरणांमध्ये केवळ 33 टक्केच पाणीसाठा

राज्यातील धरणांमध्ये केवळ 33 टक्केच पाणीसाठा

राज्यातील धरणांमध्ये सध्या 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या इतर विभागांच्या तुलनेत विदर्भाची परिस्थिती विदारक आहे. विदर्भात सध्या सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे. विदर्भातील मध्यम, लघु आणि मोठ्या 818 धरणांमध्ये सध्या अवघा 17 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळेच विदर्भातील अनेक गावांत सध्या भीषण पाणीटंचाई आहे. पावसाळ्यात कमी पडलेला पाऊस, घटलेली भूजलपातळी आणि पाण्याची उपलब्धता कमी आहे. 
वेतनवाढीवर आयटी क्षेत्रातील कर्मचारी नाराज

वेतनवाढीवर आयटी क्षेत्रातील कर्मचारी नाराज

यंदा भारतीय आयटी क्षेत्रातील वेतनवाढ कमी असल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त होत आहे. स्थिर वेतनाऐवजी ‘व्हेरिएबल पे'च्या स्वरूपातील तिमाही बोनस देण्याच्या पद्धतीवरही आयटी कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. आघाडीची आयटी कंपनी ‘टीसीएस'ने बाजार भांडवलाचा 100 अब्ज डॉलरचा टप्पा गाठला, तेव्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फेसबुकवरील ‘टीसीएस कन्फेशन' ग्रुपवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.