Short News

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcocabella.realii%2Fvideos%2F572544769764874%2F&show_text=0&width=560" width="100%" height="300" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

ती अभिनेत्री भूताच्या भूमिकेतून बाहेरच आली नाही

हॉरर चित्रपटाचे शूटींगदेखील तितक्याच भीतीदायक वातावरणात पार पडत असते. त्यामुळे सेटवर एक गुढ, थरारक, अनाकलनिय वातावरणाची निर्मिती केलेली असते. अलिकडे एका कंबोडियन हॉरर चित्रपटाचे शूटींग सुरू असताना विचित्र घटना घडली. या चित्रपटात भूताची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा अभिनय इतका जोरकस झाला की ती भूताच्या भूमिकेतून बाहेरच आली नाही. इतकेच नाही तर पछाडलेल्या या अभिनेत्रीने क्रू मेंबर्सवर हल्लाही केला.
अभिनेता सुमित राघवनच्या पत्नीसमोर विकृताचे हस्तमैथुन

अभिनेता सुमित राघवनच्या पत्नीसमोर विकृताचे हस्तमैथुन

अभिनेता सुमित राघवनची पत्नी चिन्मयी यांच्या समोर एका कार चालकाने हस्तमैथुन केल्याची घटना घडली. याप्रकरणी अभिनेता सुमित राघवनने पोलिसांनी टॅग करत ट्विटर माहिती दिली आहे. ही विकृत व्यक्ती एका बीएमडब्ल्यू गाडीचा चालक होता. चिन्मयी राघवन यांनी या विकृत प्रकाराबद्दल त्या व्यक्तिला हटकलेही. त्याला मारण्यासाठी त्याला पुढे सरसावल्या असता त्या विकृताने तेथून पळ काढला.
आगामी आर्थिक वर्षात आठ सरकारी कंपन्याचे आयपीओ

आगामी आर्थिक वर्षात आठ सरकारी कंपन्याचे आयपीओ

एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आगामी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८ सरकारी कंपन्या आयपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारात प्रवेश करणार आहेत. त्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) व राइट्स लिमिटेडही सहभागी आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या कंपन्या योग्यवेळी भांडवली बाजारात प्रवेश करतील. हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स आयपीओ आणण्यासाठी बाजार नियामक सेबीची अगोदरच मंजुरी आहे. 
मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी देशात लागू असलेल्या आणीबाणीला १५ दिवसांची वाढीव मुदत मिळावी, अशी आज संसदेला विनंती केली आहे. देशात राजकीय अराजक असल्यामुळे ही मुदत वाढावी, असे अब्दुल्ला यामीन यांनी म्हटले आहे. मालदीवच्या संसदेमध्ये बोलाविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या विनंतीवर चर्चा करण्यात आली.