Short News

डोनाल्ड ट्रम्पवर आरोप करणा-या पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियलला अटक

डोनाल्ड ट्रम्पवर आरोप करणा-या पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियलला अटक

पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल हिला ओहियोमधील एका स्ट्रिप क्लबमधून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर एका ग्राहकाला कथितस्वरुपात स्पर्श केल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती स्टॉर्मी डेनियल हिच्या वकिलाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. स्टॉर्मी डेनियल हिचे वकील मायकल एवेनट्टी यांनी ट्विट केले आहे की, स्ट्रिप क्लबमध्ये तिला एक परफॉर्म केल्याप्रकरणी अटक केली आहे.
न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बेधूंद नाचतेय 'देसी गर्ल'

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बेधूंद नाचतेय 'देसी गर्ल'

प्रियांका चोप्राचे प्रेमप्रकरण सध्या खूपच गाजत आहे. अमेरिकेचा गायक निक जोनाससोबतच्या तिच्या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे. पण चक्क निकला सोडून प्रियांका न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बेधूंदपणे नाचताना दिसत आहे. फोटोमधील गुलाबी रंगाच्या लो नेक गाऊनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिचे नाचतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मोदींच्या सभेत मंडप कोसळला; २० जखमी

मोदींच्या सभेत मंडप कोसळला; २० जखमी

पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुरू असतानाच मंडप कोसळला. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. त्यांना मिदनापूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाषण संपल्यानंतर मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मिदनापूर येथे मोदींची सभा सुरू होती. मोदींचं भाषण ऐकण्यासाठी भाजप आणि मोदी समर्थक मोठ्या संख्येने जमले होते.
कर्नल पुरोहितांच्या याचिकेवर 30 जुलैला सुनावणी

कर्नल पुरोहितांच्या याचिकेवर 30 जुलैला सुनावणी

२००८ मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ३० जुलैला सुनावणी होणार आहे. २००८ मालेगाव बॉम्बस्फोटसंदर्भांत आरोपी बनवण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने लष्कराची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे आपल्यावर खटला चालवता येणार नाही, असा दावा पुरोहित यांनी याचिकेत केला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more