Short News

दहशतवादी हाफीजच्या संघटना जाणार काळ्या यादीत

दहशतवादी हाफीजच्या संघटना जाणार काळ्या यादीत

पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यात सुधारणा केल्याने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदशी संबंधित धर्मादाय संस्थांना काळ्या यादीत टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे. हाफीज सईद जमात-ऊद-दावा व फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या संस्था चालवतो. या संस्था ‘लश्कर- ए- तयब्बा'च्या दहशतवादी आघाड्या असल्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्यांना बेकायदा ठरवले आहे. सईदच्या एलईटीने मुंबईत हल्ला केला होता. 
टांगेवाला ते अध्यात्मिक गुरु असा आहे असारामचा प्रवास

टांगेवाला ते अध्यात्मिक गुरु असा आहे असारामचा प्रवास

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू स्वतःच्या काळ्या कृत्यांमुळे तुरुंगात गेला आहे. बलात्काराच्या आरोपामुळे आसारामबापूला तुरुंगाची हवा खावी लागली. देशभरात कोट्यवधी अनुयायी, ४०० आश्रम आणि हजारो कोटींची संपत्ती असलेला आसाराम आधी एक टांगेवाला होता. आसाराम बापूचे खरे नाव आसूमल हरपलानी असे आहे. आसारामने अजमेरमध्ये टांगेवाला म्हणून कामही केले, त्यानंतर अध्यात्माकडे वळत अध्यात्मिक गुरू झाला. 
हैदराबाद संघाचा आणखीन एक गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

हैदराबाद संघाचा आणखीन एक गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

हैदराबाद संघ गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएल 11 मध्ये चार विजयासाह सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे मुंबईच्या सामन्याला मुकला होता. त्यात आणखी एका गोलंदाजाची भर पडली आहे. हैदराबद संघाचा मुख्य आधारस्तंभ असलेला बिली स्टॅनलके स्पर्धेतून बाद झाला आहे. बिली स्टॅनलकेच्या बोटाला दुखापत झाल्याने तो पुढील उपचारासाठी मायदेशी परतला आहे. 
पत्नीनेच दिली होती शिवसेना उपतालुका प्रमुखाच्या हत्येची सुपारी

पत्नीनेच दिली होती शिवसेना उपतालुका प्रमुखाच्या हत्येची सुपारी

शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश नीमसे (45) यांच्या पत्नीनेच नातेवाईकांना सुपारी देऊन शैलेश यांची हत्‍या केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. शैलेशच्या हत्येत सहभागी असलेल्‍या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून हत्‍येतील आणखी तीन आरोपी मात्र फरार आहेत. याप्रकरणी मृतकाची पत्नी मुख्य आरोपी साक्षी हिला पोलिसांनी अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून तिने शैलेशची हत्या घडवून आणली होती.