Short News

दहशतवादी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत -अमेरिकेचा इशारा

दहशतवादी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत -अमेरिकेचा इशारा

पाकिस्तानात सुरू असलेल्या कटकारास्थानांबाबत अमेरिकेने भारताला सतर्क केले आहे. पाकिस्तान नवीन प्रकारचे अण्वस्त्र विकसित करत आहे. त्यामध्ये कमी पल्ल्याच्या शस्त्रांचा समावेश आहे. सोबतच पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पाठिंबा असून त्या संघटना भारतावर हल्ल्याच्या तयारीत आहेत. असा इशारा देखील अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिला आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजेंसचे संचालक डेन कोट्स यांनीही माहिती दिली आहे.
रितेश देशमुखने घेतली मोदीची फिरकी

रितेश देशमुखने घेतली मोदीची फिरकी

सध्या संपूर्ण देशभरात डायमंड व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅँकेत केलेल्या ११,५०० कोटी रूपयांच्या महाघोटाळ्याचीच चर्चा रंगत आहे. यास बॉलिवूडदेखील अपवाद नाही. नुकतेच अभिनेता रितेश देशमुख याने नीरव मोदीची फिरकी घेताना एक ट्विट केले. रितेशने त्याच्या ‘बॅँक चोर' या चित्रपटाचा एक फोटो शेअर करताना ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी एकटाच असा ‘बॅँक चोर' आहे जो अपयशी ठरला आहे.'
बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात

बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभिनेत्री कंगना रणौत 'या' क्षेत्रात येण्याची चिन्ह

अभिनेत्री कंगना रणौत 'या' क्षेत्रात येण्याची चिन्ह

अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘मणिकर्णिका...' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीसोबतच आणखी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहे. अभिनयासोबतच ही ‘क्वीन' राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हं आहेत. कंगनाने आतापर्यंत बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून तिच्या अभिनयाने आणि समजूतदारपणाने मोदींचे मन जिंकले आहे.