Short News

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आगपाखड

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आगपाखड

जी-७ देशांच्या परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीकेची झोड उठवली. अमेरिकेच्या काही वस्तूंवर भारत 100 टक्क्यांपर्यंत कर आकारतो, असा आरोपही केला. अमेरिकेला लुबाडणाऱ्या देशांविरुद्ध व्यापारी संबंध संपुष्टात आणले जातील, अशी धमकीही दिली. भारताचे वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू अमेरिकेच्या भेटीवर मुख्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना ट्रम्प यांनी हे आरोप केले आहेत.
केरळमध्ये सापडला मेसीच्या चाहत्याचा मृतदेह

केरळमध्ये सापडला मेसीच्या चाहत्याचा मृतदेह

केरळमध्ये अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या चाहत्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फिपा फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाच्या पराभवामुळे आणि मेसीच्या खराब कामगिरीमुळे तो निराश होता. गुरूवारी क्रोएशियाविरुद्ध अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यावेळी एक सुसाइड नोट सोडून बेपत्ता झाला होता.
महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळा शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. अकोला विभागीय कार्यालयानेही ही कारावई केली. बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी कारवाईसंदर्भात माहिती दिली. दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधातील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली. 
अमरनाथ यात्रा : 27 जूनला पहिला जथ्था रवाना होणार

अमरनाथ यात्रा : 27 जूनला पहिला जथ्था रवाना होणार

अमरनाथ यात्रेचे लगबग सुरू झाली आहे. आगामी 27 जूनला पहिला जत्था जम्मूच्या भगवतीनगर बेस कॅम्पपासून रवाना होईल. त्यानंतर 28 जूनला काश्मीरच्या पहेलगाम आणि बालटाल या दोन्ही कॅम्पपासून भक्तांना पाठवले जाईल. पहिल्यांदाच जम्मूच्या बेस कॅम्पमध्ये भक्तांसाठी एसी हॉल बनवण्यात आले आहेत. अमरनाथच्या दर्शनासाठी आता देशभरात वेगवेगळ्या बँकांच्या 440 शाखांमधून दोन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी नोंदणी केली आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more