Short News

लिफाफा उडल्यानंतर ट्रम्प यांच्या सूनबाई रुग्णालयात दाखल

लिफाफा उडल्यानंतर ट्रम्प यांच्या सूनबाई रुग्णालयात दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सून व्हेनेसा ट्रम्प यांना सोमवारी एका संशयास्पद लिफाफ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डोनाल्ड ट्रम्प यांचे पूत्र आणि व्हेनेसा यांचे पती डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या मॅनहटन येथील घराच्या पत्त्यावर हा व्हिडिओ पाठवण्यात आला होता. व्हेनेसा यांनी हा लिफाफा उघडला तेव्हा त्यामध्ये सफेद रंगाची पावडर आढळून आली.
आशिक बनाया आपने गाण्यावरील या मुलीचा डान्स पहाच...
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/gepf8kjRXgA" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

आशिक बनाया आपने गाण्यावरील या मुलीचा डान्स पहाच...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेला आणि करण वाहीच्या हेट स्टोरी 4 चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अलिकडेच त्याचे पहिले गाणे आशिक बनाया आपने देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आता या गाण्यावर डान्स करतानाचा एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरूणाईला चांगलाच भावला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोनाली असे या मुलीचे नाव आहे.
पॅटमध्ये शिरला साफ अन्  व्यक्तीला फुटला घाम

पॅटमध्ये शिरला साफ अन् व्यक्तीला फुटला घाम

कधी आपल्या कपड्यामध्ये सर्प शिरला असले तर काय होईल. याचा विचार केला तरी आपल्या अंगाला काटे येतात. पण अशी घटना आस्ट्रेलियात घडली आहे. एका व्यक्तीच्या पॅटमध्ये सर्प शिरल्याची घटना समोर आली. हे जेव्हा व्यक्तीला समजले तेव्हा त्याने सर्प मित्राला बोलवून सर्प पकडला. याचा फेसबूकवर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक सर्फ पॅटमध्ये बसला होता. सदर व्यक्ती जेव्हा पॅट टाकू लागला तेव्हा सर्प बाथरुममध्येच पडला.
रायगड येथील रोहा एमआयडीसीतील एका कंपनीला आग

रायगड येथील रोहा एमआयडीसीतील एका कंपनीला आग

रायगड जिल्ह्यात रोहामधील धाटाव एमआयडीसीत भीषण आग लागली आहे. अनथिया केमिकल कंपनीच्या युनिट दोनमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.