Short News

पर्यावरणाचं रक्षण करायचंय?.. तर मग मूल नकोच!

पर्यावरणाचं रक्षण करायचंय?.. तर मग मूल नकोच!

पृथ्वीच्या संरक्षणासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकाल? इंधन वाचवाल, प्लास्टिकचा वापर टाळाल.. पण एका अभ्यासाद्वारे असं निरीक्षण नोंदवण्यात आलंय की तुम्हाला खरंच पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल, तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे मूल होऊ न देणं! संशोधकांच्या अभ्यासानुसार, मुलाचा जन्म ही पर्यावरणासाठी सर्वात घातक गोष्ट आहे.
अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/F2lN25IayH8" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीचा अॅक्शनपॅक 'बागी 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा पुन्हा एकदा एक जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान हा करणार आहे. 30 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 
कमल हसनकडून‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणा

कमल हसनकडून‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणा

कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. मदुराईच्या ओथाकडाई मैदानात आपल्या लाखो पाठीराख्यांच्या साक्षीने कमल हसनने आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली. कमल हसनच्या नवीन पक्षाचं नाव ‘मक्कल निधी मय्यम' असं आहे. आजच्या सभेदरम्यान कमल हसनने आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाचंही अनावरण केलं. एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असं हसन यांच्या नवीन पक्षांचं चिन्ह असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचे नाणेफक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचे नाणेफक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले आहे. फॉर्मात असलेला भारतीय संघ या आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. यजमान संघ मालिकेतील आव्हान कायम राखण्यास प्रयत्नशील असल्यामुळे टीम इंडियाला गाफिल राहता येणार नाही.