Short News

जग आता नवे बदल अनुभवेल : किम जोंग उन

जग आता नवे बदल अनुभवेल : किम जोंग उन

'भूतकाळामध्ये झालेल्या सर्व गोष्टी विसरून उत्तर कोरिया आता नव्याने सुरुवात करत आहे, त्यामुळे जग आता नवे बदल अनुभवेल, असे वक्तव्य उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सिंगापूर येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्याने ही प्रतिक्रिया दिली. 'उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात आज जी बैठक झाली आहे. 
लखनऊ पासपोर्ट प्रकरणाची दुसरी बाजू समोर

लखनऊ पासपोर्ट प्रकरणाची दुसरी बाजू समोर

लखनऊ पासपोर्ट केंद्रात 'धार्मिक' वादाच्या रंगात लपेटलेल्या घटनेनं आता वेगळं वळण घेतलंय. एका प्रत्यक्षदर्शीनं आरोपी तन्वी सेठ यांचे आरोप फेटाळून लावलेत. या कागदपत्रांमधून तन्वी सेठ यांची खोटेपणाची बाजू उघड झालीय. तन्वी सेठ यांचं नाव आधारकार्डावर वेगळंच आहे आणि निकाहनामामध्ये वेगळंच आहे. आधारकार्डावर त्यांचं नाव 'तन्वी सेठ' आहे तर निकाहनाम्यात 'सादिया' लिहिण्यात आलंय.
...तर लोकशाही जिवंत राहणार नाही; सरन्यायाधीशांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या न्यायमूर्तींचं विधान

...तर लोकशाही जिवंत राहणार नाही; सरन्यायाधीशांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या न्यायमूर्तींचं विधान

जर न्यायपालिका स्वतंत्र नसेल तर लोकशाही जिवंत राहणार नाही, असे मत जस्टिस जे चेलमेश्वर यांनी मांडले आहे. देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी हुकल्याचे शल्य व नाराजी मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर शुक्रवारी न्यायालयीन कामकाजातून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
खोकल्याचे औषध समजून तणनाशकाचे सेवन केल्याने तरूणाचा मृत्यू

खोकल्याचे औषध समजून तणनाशकाचे सेवन केल्याने तरूणाचा मृत्यू

नजरचूकीने केलेले कृत्य एका तरूणाच्या जीवावर बेतले आहे. कोल्हापूरातील आरडेवाडी (ता. करवीर) येथील कृष्णात पाचाकटे या तरूणाने खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केले. त्यामुळे विषबाधा होऊन या तरूणास अवघ्या १४व्या वर्षीच आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, डॉक्टरांनी औषधोपचार करून जयदीपचे प्राण वाचविण्या अथक प्रयत्न केला. पण, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more