Short News

डीएसकेंविरोधात  36 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

डीएसकेंविरोधात 36 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांनी दोन हजार 43 कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. डिसकेंविरोधात आज आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके सध्या येरवडा कारागृहात आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने 36 हजार 875 पानांचे आरोपपत्र आज न्यायालयात दाखल केले आहे. 
शाओमी रेडमी नोट 4 च्या किमतीत मोठी सूट

शाओमी रेडमी नोट 4 च्या किमतीत मोठी सूट

कमी किंमतीत अत्यंत उपयोगी स्मार्टफोन विकत घेण्याची संधी शाओमी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. शाओमी रेडमी नोट 4 वर सूट मिळत आहे. याबद्दल माहिती शाओमी इंडियाचे प्रमुख आणि शाओमीचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा स्मार्टफोन 11,999 रुपयांत खरेदी करू शकतात. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये होती.
भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगा

भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगा

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटो आणि नावाचा भाजपकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप जयश्री वनगा यांनी केला असून भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
अन् पालकमंत्र्यांनी आमदारांना ठोकला सलाम

अन् पालकमंत्र्यांनी आमदारांना ठोकला सलाम

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट पुन्हा एकदा आपल्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील आयुक्तालयात आले असता त्यांनी चक्क दोन आमदारांना सलाम ठोकला. त्यांच्या या कृतीमुळे आमदारांसह पोलीस अंचबित झाले. गिरीश बापट हे पिंपरी चिंचवड शहरातील स्वतंत्र आयुक्तालया संदर्भाच्या बैठकीला बापट आले शहरात आले होते. यावेळी त्यांनी बैठकस्थळी येताच आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना सलाम ठोकला.