Short News

अमेझॉनला लाखो रुपयांचा गंडा, डिलिव्हरी बॉयसह 4 जण अटकेत

अमेझॉनला लाखो रुपयांचा गंडा, डिलिव्हरी बॉयसह 4 जण अटकेत

भिवंडीमध्ये अमेझॉनकडून ग्राहकांना येणारे पार्सल फोडून त्याऐवजी साबणाच्या वड्या त्यात भरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 57 मोबाईल, 3 लॅपटॉप असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी देशात लागू असलेल्या आणीबाणीला १५ दिवसांची वाढीव मुदत मिळावी, अशी आज संसदेला विनंती केली आहे. देशात राजकीय अराजक असल्यामुळे ही मुदत वाढावी, असे अब्दुल्ला यामीन यांनी म्हटले आहे. मालदीवच्या संसदेमध्ये बोलाविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या विनंतीवर चर्चा करण्यात आली. 
शेअर बाजार गडगला;  सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

शेअर बाजार गडगला; सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

 सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २३६ अंकांनी घटत ३३, ७७४ वर आला. तर निफ्टी ७४ अंकांनी उतरत १०,३७८ वर व्यवहार बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मिडकॅपमध्ये १.०७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅपमध्ये १.४२ टक्यांनी घट झालेली दिसली. बीएसईमधील सर्व १९ सेक्टरच्या शेअर्स घसरण झालेली दिसली.
नीरव मोदीला त्याच्या पापाची शिक्षा होईल ; रामदेव बाबांनी दिला शाप

नीरव मोदीला त्याच्या पापाची शिक्षा होईल ; रामदेव बाबांनी दिला शाप

मी फक्त एकाच मोदीला ओळखतो, ते म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त जे पण मोदी आहेत जे, घोटाळे करतात त्यांच्यामुळे देशाचे नाव खराब होते. नीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल. मोदी सरकार त्याला त्याच्या योग्य जागी पाठवेल, असा विश्वास योग गुरु रामदेव बाबांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील मुलमध्ये योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी रामदेव बाबा आले होते.