Short News

शेतकरी धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला

शेतकरी धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला

मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे.धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे. पाटील यांच्या ५एकर जमिनीसाठी ५४लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. यापूर्वीचा पंचनामा रद्द करण्यात आला असून रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान मान्य केला.
ईपीएफओकडून नोकरदारांना झटका

ईपीएफओकडून नोकरदारांना झटका

देशातील नोकरदारांना झटका देणारे एक वृत्त असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ साठीच्या व्याजदरात कपात केली आहे. गेल्या वर्षी हा व्याजदर ८.६५ टक्के इतका होता तो आता ८.५५ टक्के इतका असणार आहे. ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाच्या ट्रस्टींच्या सभेत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचारी वर्गात मात्र नाराजी पसरली आहे.
धोनी - पांड्याची शानदार खेळी; भारताचे आफ्रिकेसमोर 189 धावांचे आव्हान

धोनी - पांड्याची शानदार खेळी; भारताचे आफ्रिकेसमोर 189 धावांचे आव्हान

मनिष पांडेने 48 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीने केलेल्या 79 धावा आणि धोनीने 28 चेंडूत तीन षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने केलेल्या 52 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 188 धावा केल्या. आज खूप दिवसानी धोनीची बॅट मैदानावर तळपलेली पहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून ज्यूनीयर डालाने सर्वाधीक दोन विकेट घेतल्या.
अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/F2lN25IayH8" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीचा अॅक्शनपॅक 'बागी 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा पुन्हा एकदा एक जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान हा करणार आहे. 30 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.