Short News

आठ महिन्यांच्या चिमुकलीला पळवणाऱ्या महिलेला अटक

आठ महिन्यांच्या चिमुकलीला पळवणाऱ्या महिलेला अटक

रेल्वे स्टेशनवरून ८महिन्यांची मुलगी पळवणाऱ्या महिलेला अटक करण्यात पुणे रेल्वे पोलिसांना यश आले आहे. स्वत:ला मूल होत नसल्याने या महिलेने लोकांची लेकर पळवण्याचा धंदा सुरू केला होता. रंजना जगन्नाथ पांचाळ उर्फ अनुष्का रवींद्र रणपिसे असे या महिलेचे नाव आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथील दर्ग्याजवळून ५फेब्रुवारी रोजी पुण्यात कामाच्या शोधात आलेल्या चाबुकस्वार या दाम्पत्यांशी अनुष्का रणपिसे हिने सलगी केली.
आज रेडमी नोट 5 खरेदी करण्याची सुवर्णसंधी

आज रेडमी नोट 5 खरेदी करण्याची सुवर्णसंधी

शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. रेडमी नोट 5ची विक्री केवळ Mi.com या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर केली जाईल. कंपनीने ट्विटरवरुन याची माहिती दिली. रात्री 12वाजेपासून रेडमी नोट5 विक्रीसाठी उपलब्ध होईल. 
विश्वचषक जिंकणे माझे स्वप्न नाही- एबी डिवीलिअर्स

विश्वचषक जिंकणे माझे स्वप्न नाही- एबी डिवीलिअर्स

2019 चा विश्वचषक जस जसा जवळ येत आहे तसे अनेक खेळाडूंची विधाने समोर येत आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिवीलिअर्सने माध्यामांशी बोलताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. 2019 चा विश्वचषक जिंकणे हे माझे अंतिम स्वप्न नसल्याचे एबी डिवीलिअर्स म्हणाला. आपले विचार बदलले असून आपण एकावेळी एकाच स्पर्धेचा विचार करत असल्याचेही तो म्हणाला. 
शेतकऱ्यांना 2001 पासून कर्जमाफी देण्यास मंजुरी

शेतकऱ्यांना 2001 पासून कर्जमाफी देण्यास मंजुरी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना देण्याविषयीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे 2008 व 2009 च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊस यासाठी 2001 ते 2016 दरम्यान घेतलेल्या मात्र थकीत राहिलेल्या कर्जाचाही यात समावेश आहे.