Short News

शरद पवारांनी अमिर खानला दिला हिताचा सल्ला

शरद पवारांनी अमिर खानला दिला हिताचा सल्ला

 पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी अभिनेता अमिर खानने आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी आमिर खान आणि त्यांच्या टीमला अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. देशात शेतीसाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे शरद पवारांनी त्यांना सांगितले. 
केवळ काँग्रेस-जेडीएस आनंद साजरा करताहेत : अमित शहा

केवळ काँग्रेस-जेडीएस आनंद साजरा करताहेत : अमित शहा

कर्नाटकमध्ये पूर्वी ४० जागा असलेल्या भाजपाने यंदा १४० जागा जिंकल्या. यावरुन जनादेश हा काँग्रेसविरोधातच असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होत असताना कर्नाटकची जनता नव्हे तर केवळ काँग्रेस-जेडीएसच आनंद साजरा करीत आहेत, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री आज ठाण्यात

पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री आज ठाण्यात

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पेटला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ठाण्यात एमएमआरडीएच्या विविध प्रकल्प उद्घाटन आणि प्रकल्प भूमिपूजनां च्या कार्यक्रमांसाठी येत आहेत. यावेळी राज्य मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्याचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष असेल.
बिग बॉसच्या घरात ‘आक्कासाहेब’ हिट

बिग बॉसच्या घरात ‘आक्कासाहेब’ हिट

अभिनेत्री हर्षदा खानविलकरने ‘आक्कासाहेब' ही भूमिका साकारुन टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिने साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांनी जणू काही डोक्यावरच उटलून घेतलं होतं. याच लोकप्रियतेच्या बळावर तिला बिग बस मराठीच्या घरात प्रवेश मिळाला. हर्षदाच्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणेच तिची या घरात अगदी दणक्यात एंट्री झाली. ज्यामुले या कार्यक्रमाच्या टीआरपी रेटिंगमध्येही वाढ झाली.