Short News

अमित शाहांनी 34 दिवसात केला 57000 किमीचा प्रवास

अमित शाहांनी 34 दिवसात केला 57000 किमीचा प्रवास

कर्नाटक विधानसभेत भाजपने बहुमत जरी नाही मिळवले तरी आलेले यश हे मोठे आहे. राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमामुळे पक्षाला ही कामगिरी करता आली. परंतु पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या अत्यंत नियोजनबद्ध आणि अविरत प्रयत्नामुळे पक्षाला हे यश पाहता आले. अमित शाहंनी कर्नाटकात 34 दिवसाच्या आपल्या मुक्कामात 28 जिल्ह्यातून 57,135 किमीचा प्रवास केला. शाह यांनी एकूण 59 सभा घेतल्या.
रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कॉन्स्टेबलकडून मारहाण

रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कॉन्स्टेबलकडून मारहाण

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीवर एका पोलीस कॉन्स्टेबलने हल्ला केला. गुजरातच्या जामनगरमध्ये शारु सेक्सशन रोडवर सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. छोटयाशा अपघातानंतर संतप्त झालेल्या या पोलीस कॉन्स्टेबलने जडेजाची पत्नी रिवा सोळंकीला थेट मारहाण केली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संजय अहीर असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
22 मे 2018 : मुंबईत पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महाग

22 मे 2018 : मुंबईत पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महाग

मागील दोन-तीन आठवड्यापासून स्थिर असलेले इंधनाचे दर वाढू लागले आहेत. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात 33 पैशांनी वाढ झाली, तर डिझेलमध्ये 26 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीतही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. मुंबईत पेट्रोल 84.70 रु.प्रतिलिटर. तर डिझेल 72.48 रु. प्रतिलिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 76.87 रु.प्रतिलिटर तर डिझेल 68.08 रु. प्रतिलिटर आहे.
पाकिस्तान गोळीबारात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

पाकिस्तान गोळीबारात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील सीरी कालाय गावात ही दुर्देवी घटना घडली. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.