Short News

सुप्रिया सुळेंनी जेजुरीगडावर 40 किलोंचा खंडा उचलला

सुप्रिया सुळेंनी जेजुरीगडावर 40 किलोंचा खंडा उचलला

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कृतीतून महिला या अबला नाही, तर सबला असल्याचं दाखवून दिलं आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत अशी ख्याती असलेल्या जेजुरीगडावरील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे काल गेल्या होत्या. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या गडावर गेल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया यांनी चक्क 40 किलो वजनाचा खंडा (तलवार) उचलून सर्वांना चकित केलं.
रायगड येथील रोहा एमआयडीसीतील एका कंपनीला आग

रायगड येथील रोहा एमआयडीसीतील एका कंपनीला आग

रायगड जिल्ह्यात रोहामधील धाटाव एमआयडीसीत भीषण आग लागली आहे. अनथिया केमिकल कंपनीच्या युनिट दोनमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. 
सीख चालकाला प्रवाशाने दाखवला बंदुकीचा धाक, विचारले 'हे' प्रश्न

सीख चालकाला प्रवाशाने दाखवला बंदुकीचा धाक, विचारले 'हे' प्रश्न

न्यूयॉर्कमध्ये एका उबेर कारच्या सीख चालकाला बंदुकीचा दाखवल्याची घटना घडली. मला पगडी घातलेल्यांचा, दाढीवाल्यांचा राग येतो' असे सांगत एका प्रवाशाने चालकाला बंदुक दाखवली. गुरजीत सिंग असे उबेर चालकाचे नाव आहे. गुरजीत यांना बंदुकीचा धाक दाखवत या प्रवाशाने त्यांना त्यांचे राष्ट्रियत्व, वंश आणि अमेरिकेप्रती त्यांच्या निष्ठेबद्दलच्या प्रश्नांचा भडिमार केला. 
‘BAFTA’ मध्ये रंगली  अँजेलिनाच्या ‘बॅक टॅटू’ चर्चा

‘BAFTA’ मध्ये रंगली अँजेलिनाच्या ‘बॅक टॅटू’ चर्चा

बाफ्ता पुरस्काराने साऱ्यांचेच लक्ष पुन्हा एकदा आपल्याकडे वेधून घेतले आहे. हॉलिवूडप्रेमींचे लक्ष या सोहळ्याकडे लागलेले असते. यावेळच्या कार्यक्रमात अनेक हॉलिवूड तारकांनी आवर्जुन हजेरी लावली. यावेळी अँजेलिना जोलीने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाउन घातला होता. बाफ्ताच्या या सोहळ्यात सर्वात जास्त चर्चा कसली झाली असेल तर ती अँजेलिनाच्या पाठीवर असलेल्या टॅटूची. या टॅटूची खासियत काही वेगळी आहे.