Short News

बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

आज मध्यरात्रीपासून बेस्टच्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून बेमुदत बंद पुकारला आहे. पण बेस्ट कामगार कृती समितीमध्ये मात्र फूट पडली आहे. या संपात शिवसेनेची बेस्ट कामगार संघटना सहभागी होणार नाही. तर भाजप बेस्ट कामगार संघटनाही आज संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय घेणार आहे. बेस्टची वाटचाल खाजगीकरणाकडे चालल्याच्या विरोधात हा बंद पुकारण्यात येणार आहे.
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, मोदींनी केली राहुल गांधींची विचारपूस

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, मोदींनी केली राहुल गांधींची विचारपूस

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरशी घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काँग्रेसने याविरोधात कर्नाटक पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामागे, आंतरराष्ट्रीय टॅम्परिंग असल्याची शंकाही काँग्रेसने व्यक्त केली आहे. यादरम्यान चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना कॉल करुन विचारपूस केली. 
डायना 'मिस वर्ल्ड' कशी? विप्लव देव यांना पडला प्रश्न

डायना 'मिस वर्ल्ड' कशी? विप्लव देव यांना पडला प्रश्न

भारतात महाभारताच्या काळातही इंटरनेटचा वापर केला जात होता, असं वक्तव्य करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी विप्लव कुमार यांनी सौंदर्य स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.‘मिस वर्ल्ड' अर्थात विश्वसुंदरी डायना हेडनचा निकाल ‘फिक्स' होता, ती किताबास पात्र होती का? असा सवाल विप्लव देव यांनी उपस्थित केला. 
'राज्यसभेची जागा गेल्यावरच रेणुका यांना ‘कास्टिंग काऊचचा सिनेमा दिसला'

'राज्यसभेची जागा गेल्यावरच रेणुका यांना ‘कास्टिंग काऊचचा सिनेमा दिसला'

सिने उद्योगातच नाही,तर राजकारणातील स्त्रीयांनाही ‘कास्टिंग काऊच'चे शिकार व्हावे लागते. असे विधान रेणुका चौधरी यांनी केले होते. त्यावर राज्यसभेची जागा सोडावी लागल्यावरच त्यांना संसदेतील ‘कास्टिंग काऊच'चा सिनेमा का दिसला? असा सवाल शिवसेनेने 'सामना'मधून केला आहे. रेणुकांचे हे विधान बेजबाबदारपणाचे आणि समस्त महिलावर्गाचा अपमान करणारे असल्याची टीकाही शिवसेनेने केली.