Short News

बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे

बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे

बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून बेस्टचे जवळपास ३५ हजार कर्मचारी संपावर जाणार होते. मात्र औद्योगिक न्यायालयाने बेस्ट कृती समितीला संप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे मध्यरात्रीपासून सुरु होणारा संप मागे घेण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता , शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या !

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता , शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या !

उत्तर महाराष्ट्रावर पुन्हा एकदा गारपिटीचे सावट आहे. कारण २३ फेब्रुवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्रात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर नाशिकचे जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, पिके उघड्यावर सोडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीने थैमान घातले होते. 
विराट मोडू शकतो विवियन रिचर्ड्सचा विक्रम

विराट मोडू शकतो विवियन रिचर्ड्सचा विक्रम

क्रिकेटच्या दुनियेतील फलंदाजीचे सर्वच रेकॉर्ड एक एक करत विराट कोहली सर्वच रेकॉर्ड तोडत आहेत. आता तो अशा एका रेकॉर्डकडे पुढे जात आहे जो आत्तापर्यंत केवळ वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांनीच केलाय. एका दौ-यात १ हजारांपेक्षा जास्त रन्स करण्याचा कारनामा त्यांनी एकदा केला आहे. आता विराट कोहली या रेकॉर्डच्या जेवळ आहे. आफ्रिका दौ-यात विराटने आत्तापर्यंत ८७९ रन्स केलेत.
ताजमहालबाबतीत केंद्र सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण

ताजमहालबाबतीत केंद्र सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण

ताजमहाल हे तेजोमहाल नामक मंदिर असल्याच्या याचिकेला सरकारच्या वतीने उत्तर देताना आज येथील दिवाणी न्यायालयात सरकारने ताजमहालाविषयी पुरातत्व विभागाच्या हवाल्याने उत्तर देताना ताजमहाल शिवालय नसल्याचा दावा केला. या ठिकाणी शिवालयाचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.