Short News

विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपचेही 'रिसार्ट प्लानिंग'

विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपचेही 'रिसार्ट प्लानिंग'

कर्नाटकमध्ये दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांची आलिशान रिसॉर्टमध्ये बडदास्त ठेवली आहे. तर महाराष्ट्रात भाजपनेही याच कृतीचा कित्ता गिरवला. लातूर-उस्मानाबाद आणि बीड विधानपरिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. लातूर महानगरपालिकेचे भाजपचे निवडून आलेले 36 आणि तीन स्वीकृत नगरसेवक असे 39 नगरसेवक रिसॉर्टला गेले.   
'देसी गर्ल' प्रियांकाच्या या शाही ड्रेसवर जेटली नाराज

'देसी गर्ल' प्रियांकाच्या या शाही ड्रेसवर जेटली नाराज

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचे रॉयल वेडिंग नुकताच पार पडले. प्रियांका आणि मेगन या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रीणी असून, आपल्या मैत्रीणाला शुभेच्छा देण्यासाठी ही ‘देसी गर्ल' शाही विवाह सोहळ्याला पोहोचली. समता पार्टीच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांना प्रियांका चोप्राचा ड्रेस काही खास पसंत पडला नाही. ती भारताच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणे सोडून ब्रिटिश अरिस्टोक्रेट ड्रेसमध्ये दिसली.
कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही क्लीन चीट

कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही क्लीन चीट

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सरकारी नामुष्कीने दोषमुक्त ठरलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही लाचलुचप्रतिबंधक न्यायालयातून मंगळवारी दिलासा मिळाला. कृपाशंकर सिंह यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता या सर्वांना मंगळवारी न्यायालयाने क्लीन चीट दिली. या खटल्यात कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त करण्यात आले होते.
तापसीच्या 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

तापसीच्या 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

बॉलिवुडची 'पिंक गर्ल' तापसी पन्नूचा आगामी 'मुल्क' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये तापसी पुन्हा एकदा कोर्टात पाहायला मिळत आहे. या फर्स्ट लूकमध्ये ती एका वकीलाच्या वेशात दिसत आहे. तापसीने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर हा फर्स्ट लूक शेअर केला.