Short News

चंद्रपूरच्या  चार विद्यार्थ्यांनी सर केला एव्हरेस्ट

चंद्रपूरच्या चार विद्यार्थ्यांनी सर केला एव्हरेस्ट

जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात चंद्रपूरमधील चार विद्यार्थ्यांना यश आले आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर, जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विदयार्थ्यातील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत 'मिशन शौर्य'ची आखणी केली होती. मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
गांधींजींच्या सन्मानार्थ रेल्वे साजरा करणार ‘शाकाहार दिवस’

गांधींजींच्या सन्मानार्थ रेल्वे साजरा करणार ‘शाकाहार दिवस’

येत्या दोन ऑक्टोबरला देशात फक्त राष्ट्रीय स्वच्छता दिवसच नव्हेतर महात्मा गांधींच्या सन्मानार्थ ‘शाकाहार दिवस' म्हणूनही साजरा केला जाईल. रेल्वेने तयार केलेल्या या प्रस्तावानुसार दोन ऑक्टोबर 2018, 2019 आणि 2020 मध्ये रेल्वे स्थानक किंवा कार्यालय परिसरात प्रवाशांना मांसाहार जेवण दिले जाणार नाही. केंद्र सरकारने 2020 मध्ये महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बीड, लातूर आणि उस्मानाबादेत  भाऊ-बहिणीची प्रतिष्ठा पणाला

बीड, लातूर आणि उस्मानाबादेत भाऊ-बहिणीची प्रतिष्ठा पणाला

लातूर, बीड आणि उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलेले सुरेश धस यांना उमेदवारी देवून धनंजय मुंडे यांच्यासमोर आव्हान उभे केले. तर राष्ट्रवादीने अपक्ष अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत करून ही निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार केली आहे. या निवडणुकीमुळे मुंडे बहिण-भाऊ आमनेसामने उभे ठाकले आहेत. 
पाकिस्तानी रेंजर्संना  वाटू लागली बीएसएफची भीती

पाकिस्तानी रेंजर्संना वाटू लागली बीएसएफची भीती

शस्त्रसंधी उल्लंघनाला भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिल्याने पाकिस्तानला धडकी भरली आहे. आता पाककडून भारताला फायरिंग न करण्याची विनंती केली जात आहे. रविवारी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने गा दावा केला. बीएसएफच्या मते पाकिस्तान रेंजर्सने त्यांना इंटरनॅशनल बॉर्डरवर फायरिंग थांबवण्याचा आग्रह केला आहे. पाकिस्तानच्या फायरिंगला प्रत्युत्तर देत बीएसएफनेही पाकच्या अनेक चौक्या उध्वस्त केल्या आहेत.