Short News

अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते – छगन भुजबळ

अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते – छगन भुजबळ

मला अटक होईल अशी चर्चा माझ्या कानावर येत होती. पण मी काही चुकीचे केले नव्हते त्यामुळे मला अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. भ्रष्टाचार झालाच नाही तर माझ्या अटकेचा प्रश्न येतो कुठे अशी माझी समजूत होती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळा प्रकरणात मला अटक झाली.पण मी नेमणुक केली नव्हती असे त्यांनी म्हटले.
टॅक्सी, रिक्षाचे भाडे २ रुपयांनी वाढणार, परिवहन खात्याची मंजूरी

टॅक्सी, रिक्षाचे भाडे २ रुपयांनी वाढणार, परिवहन खात्याची मंजूरी

मुंबईकरांना आता टॅक्सी, रिक्षाच्या भाडेवाढीचाही सामना करावा लागणार आहे. आधीच अन्नधान्य, पेट्रोल अशा जीवनपयोगी सेवा, वस्तू महागल्यानंतर आता नागरिकांना टॅक्सी, रिक्षा भाडेवाढही सहन करावी लागणार आहे. टॅक्सी, रिक्षाच्या भाड्यात २ रुपयांनी दरवाढ होणार आहे. या दरवाढीला परिवहन खात्याने नुकतीच मंजुरी दिली आहे. ३ रुपये दरवाढ करण्याचा प्रस्ताव वाहतूक संघटनांनी केला होता.
राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी लागू

राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी लागू

राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी लागू होणार आहे. उद्यापासून तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला तब्बल 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. 
सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत

सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत

बालगंधर्व, लोकमान्य नंतर आता अभिनेता सुबोध भावे आणखी एका चरित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटाचं नावं आहे 'काशिनाथ घाणेकर'. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट व्हायाकॉम १८ आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सची निर्मिती असणार आहे. पोस्टर वर काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत सुबोध भावे दिसत आहे. चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सुमीत राघवन यांच्यादेखील प्रमुख भूमिका असतील.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more