Short News

'राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार'

'राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार'

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि गारपीटग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यात मराठवाडा, विदर्भासह काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटी व मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ईपीएफओकडून नोकरदारांना झटका

ईपीएफओकडून नोकरदारांना झटका

देशातील नोकरदारांना झटका देणारे एक वृत्त असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ साठीच्या व्याजदरात कपात केली आहे. गेल्या वर्षी हा व्याजदर ८.६५ टक्के इतका होता तो आता ८.५५ टक्के इतका असणार आहे. ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाच्या ट्रस्टींच्या सभेत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचारी वर्गात मात्र नाराजी पसरली आहे.
धोनी - पांड्याची शानदार खेळी; भारताचे आफ्रिकेसमोर 189 धावांचे आव्हान

धोनी - पांड्याची शानदार खेळी; भारताचे आफ्रिकेसमोर 189 धावांचे आव्हान

मनिष पांडेने 48 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीने केलेल्या 79 धावा आणि धोनीने 28 चेंडूत तीन षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने केलेल्या 52 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 188 धावा केल्या. आज खूप दिवसानी धोनीची बॅट मैदानावर तळपलेली पहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून ज्यूनीयर डालाने सर्वाधीक दोन विकेट घेतल्या.
अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/F2lN25IayH8" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीचा अॅक्शनपॅक 'बागी 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा पुन्हा एकदा एक जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान हा करणार आहे. 30 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.