Short News

सांगून ठेवतो! मग नाणार प्रकल्प गुजरातला जाईल - मुख्यमंत्री

सांगून ठेवतो! मग नाणार प्रकल्प गुजरातला जाईल - मुख्यमंत्री

नाणार प्रकल्पापासून कोणतेही नुकसान नाही. कोकणातील शेती, आंबे आदीवर प्रदुषणाचा परिणाम होईल हा गैरसमज पसरविला जात आहे. रिफायनरी प्रकल्पापासून कसलाही धोका नाही. गेल्या 50 वर्षापासून मुंबईतील चेंबूरसारख्या गर्दीच्या भागात रिफायनरीचे काम सुरू आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीबाबतचा गैरसमज पसरविण्याचे काम थांबवावे अन्यथा हा प्रकल्पा गुजरातला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 
मोदी सरकारची कसोटी : तेल, नैसर्गिक वायू, कोळसा 20 टक्क्यांनी महागण्याचा अंदाज

मोदी सरकारची कसोटी : तेल, नैसर्गिक वायू, कोळसा 20 टक्क्यांनी महागण्याचा अंदाज

यंदा ऊर्जा क्षेत्रातील कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा या उत्पादनाच्या किमतीत 20 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. या दरवाढीचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही जागतिक बँकेने नमूद केले आहे. जागतिक बँकेने ‘एप्रिल कमॉडिटी मार्केटस् आऊटलूक' या अहवालात म्हटले आहे की, 2018मध्ये कच्च्या तेलाच्या किमती सरासरी 65 डॉलर प्र्रतिबॅरल राहतील. २०१७मध्ये त्या 53डॉलर प्रतिबॅरल होत्या. 
न्या. लोया यांच्या मृत्यू संदर्भातील पीआयएल फिक्स - सिब्बल

न्या. लोया यांच्या मृत्यू संदर्भातील पीआयएल फिक्स - सिब्बल

लोया मृत्यूप्रकरणात जी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती फिक्स होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या माणसानेच ही याचिका दाखल केली होती. त्यामागे केवळ राजकीय हेतू होता,' असा खळबळजनक आरोप करतानाच 'न्यायव्यवस्थेने दबावाखाली येऊ नये,असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केले. सूरज लोलगे नावाच्या व्यक्तिने ही पीआयएल दाखल केली असून लोलगे हा नागपूरचा आहे.
साक्षीची 'ती' इच्छा पूर्ण करत धोनीने जिंकला सामना

साक्षीची 'ती' इच्छा पूर्ण करत धोनीने जिंकला सामना

बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात धोनीने षटकार मारत आपल्या स्टाईलने चेन्नईला विजय मिळवून दिला. 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने 70 धावा केल्या. धोनीच्या षटकारांमुळे त्याचे चाहते आणि त्याची पत्नी साक्षीचा आनंद गगनात मावत नव्हता. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हारल झाला आहे. हा व्हिडीओ चेन्नईच्या 18व्या षटकातील आहे. यामध्ये साक्षी धोनीला षटकार मारण्यासाठी सांगत आहे.