भर उन्हातही नागपूर वाहतूक पोलीस राहणार चिल्ड
महाराष्ट्र
- 8 days ago
रणरणत्या उन्हात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना कूल वेस्ट जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाहेरील तापमानापेक्षा 6 अंशांपर्यंत कमी तापमान राखण्यास मदत करणाऱ्या या जॅकेटमुळे तप्त उन्हातही पोलिसदादा कूल कूल राहतील. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरूमचे शुक्रवारी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.