Short News

अन् सलूनमध्येच बांधली  त्यांनी लग्नाची रेशीमगाठ

अन् सलूनमध्येच बांधली त्यांनी लग्नाची रेशीमगाठ

अनेकांना आपले लग्न कायम लक्षात राहावे यासाठी लोक अनेक कल्पना लढवल्या जातात. त्यानुसार विविध प्रकारे विवाह केला जातो. कोणी हवेत लग्न करतात, तर कोणी डोंगरावर जाऊन रेशीमगाठ बांधतात. नाशिकमध्ये अशाच एका जोडप्याने अनोख्या पद्धतीने लग्न केले. यांनी ना हवेत, ना डोंगरावर,  यांनी चक्क एका सलून दुकानात रेशीमगाठ बांधली. गणेश बिरारी आणि दीपिका वाघ अशी या नव दाम्पत्याची नावे आहेत. 
तापसीच्या 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

तापसीच्या 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

बॉलिवुडची 'पिंक गर्ल' तापसी पन्नूचा आगामी 'मुल्क' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये तापसी पुन्हा एकदा कोर्टात पाहायला मिळत आहे. या फर्स्ट लूकमध्ये ती एका वकीलाच्या वेशात दिसत आहे. तापसीने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर हा फर्स्ट लूक शेअर केला.
निपाह व्हायरसमुळे नर्सचा बळी; मृत्युपूर्वी पतीला लिहिले हृदयद्रावक पत्र

निपाह व्हायरसमुळे नर्सचा बळी; मृत्युपूर्वी पतीला लिहिले हृदयद्रावक पत्र

केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात पसरलेल्या घातक आणि तितक्याच दूर्मिळ निपाह व्हायरसमुळे आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात पोरांबरा तालुका रूग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या लिनी (वय३१) नावाच्या एका नर्सचाही समावेश आहे. दरम्यान, लिनीने मृत्यूपूर्वी मोठा त्याग केला आहे. ज्याची प्रसारमाध्यमांतून चर्चा होत आहे. आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे समजताच लिनीने स्वत:ला कुटुंबियांपासून दूर ठेवले.
कर्नाटकात आता उपमुख्यमंत्रीपदाचा वाद

कर्नाटकात आता उपमुख्यमंत्रीपदाचा वाद

जेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहे. पण राज्यात उपमुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आमदार दलित उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे तर लिंगायत आमदार लिंगायत उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे. जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी मुस्लीम किंवा दलित उपमुख्यमंत्रीसाठी आग्रही आहेत.