Short News

केरळमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या

केरळमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील मत्तानूरमध्ये युवक काँग्रेसच्या २९ वर्षीय कार्यकर्त्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. एस. पी. सुहैब असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. सुहैब आणि पक्षाचे अन्य दोन कार्यकर्ते रस्त्यालगत उभे होते. त्याचवेळी चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गावठी बॉम्ब फेकला आणि त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खान सध्या काविळने त्रस्त झाला आहे. त्याच्या या आजारामुळेच त्याच्या सिनेमांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले आहे. इरफानला द मिनस्ट्री या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पंजाबला जायचे होते. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर लगेच तो ब्लॅकमेल या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात करणार होता. पण आता काविळ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरी येथील धील ईशांत कंपाऊंडमधील एशियन केमिकल कंपनीला गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे.
जळगावात मानसिक तणावातून विवाहित तरुणाची आत्महत्या

जळगावात मानसिक तणावातून विवाहित तरुणाची आत्महत्या

मानसिक तणावामुळे एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात शहरात घडली. संदीप उत्तम राजपूत (२५) असे या तरुणाचे नाव आहे. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी येथील डोळ्यांच्या धर्मार्थ दवाखाना येथे असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. संदीप हा बुधवार पासून बेपत्ता होता. आज सकाळी त्याचा मृतदेह विहिरीत तंरगताना दिसला.