Short News

लोकलमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे महिलेचा मृत्यू

लोकलमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे महिलेचा मृत्यू

पश्चिम रेल्वेचे गाडे विस्कळीत झाले असतानाच, गुरुवारी लोकलमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे अलका पाठारे (४०) यांना जीव गमवावा लागला. बोरिवली स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. तीनवर सकाळी ९.४५च्या तुडुंब भरलेल्या लोकलमध्ये शिरण्याच्या प्रयत्नात लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत कोसळून त्यांचा मृत्यू ओढवला. नॅन्सी कॉलनीमध्ये राहणाऱ्या पाठारे यांनी बीकेसी येथील कार्यालयात जाण्यासाठी बोरिवली स्थानक गाठले.
औरंगाबादेतील कचरा प्रश्न साफ झाल्यानंतरच लोकसभेत  जा; खैरेंना आदेश

औरंगाबादेतील कचरा प्रश्न साफ झाल्यानंतरच लोकसभेत जा; खैरेंना आदेश

जोपर्यंत कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लोकसभेत जाऊ नका,असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे लोकसभेत गेलो नाही असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विभागीय आयुक्तालयात आयोजित बैठकीत सांगितले. कचरा प्रश्नावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक बोलावली असून आमदार संजय शिरसाट आणि यांनी विभागीय आयुक्तांना खडेबोल सुनावले. 
बुराडी सामूहिक आत्महत्या : भाटीया कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू

बुराडी सामूहिक आत्महत्या : भाटीया कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीच्या बुराडीमध्ये ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येनंतर आता कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मृत्यूनंतर पाळीव कुत्रा टॉमी याला ‘हाउस ऑफ स्ट्रे एनिमल्स' (HSA) येथे ठेवण्यात आले होते. येथे त्याची देखभाल केली जात होती. मात्र, रविवारी संध्याकाळी जवळपास ७ वाजेच्या दरम्यान टॉमीचा मृत्यू झाला.
भाजप-आरएसएसकडून शिका, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

भाजप-आरएसएसकडून शिका, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना संबोधित करताना भाजपा आणि आरएसएसकडून शिकण्याचा सल्ला दिला. 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान 300 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. भाजप आणि आरएसएसचे लोग सामान्य लोकांपर्यंत जाऊ काम करता तसे तुम्ही करा असा सल्ला त्यांनी दिला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more