Short News

चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, नराधमाला 14 वर्षांचा तुरुंगवास

चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, नराधमाला 14 वर्षांचा तुरुंगवास

धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने एका 43 वर्षीय नराधमाला 14 वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर या नराधमाने बलात्कार केला होता. 2013साली ही संतापजनक घटना मोहाडी परिसरात घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 40 हजार रुपयांचा दंडासह 14 वर्षाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याचा अधिक कारावास अधिक सोसावा लागेल, गोविंद नारायण घुले असे आरोपीचे नाव आहे. 
'धडक' सिनेमाच्या टीमला नागराज मंजुळेंनी दिल्या शुभेच्छा

'धडक' सिनेमाच्या टीमला नागराज मंजुळेंनी दिल्या शुभेच्छा

'धडक' हा सिनेमा उद्या रिलीज होणार आहे. या सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. नागराज मंजुळे यांनी या हिंदी सिनेमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 'सैराट' सिनेमाचे दिग्दर्शक-लेखक नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट लिहीली असून त्यातून त्यांनी 'धडक'च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी जान्हवी कपूरला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑफिसला उशिरा पोहोचला म्हणून बॉसने केली कार गिफ्ट

ऑफिसला उशिरा पोहोचला म्हणून बॉसने केली कार गिफ्ट

जार्जिया येथे एका कंपनी मालकाने ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी उशिरा आल्यामुळे त्याला कार गिफ्ट केली. होय अगदी बरोबर वाचलात,  वॉल्टर हा बेलहॉप्स कंपनीसाठी काम करतो. बेल्हॉप्समध्ये त्यांचा नोकरीचा पहिलाच दिवस होता. ही कंपनी लोकांचे सामान एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचे काम करते. ल्यूक मार्क्लिन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वॉल्टरला बक्षिस म्हणून ही कार दिली. 
भारताच्या ध्वजावरून अशोक चक्र गायब, महिला हॉकी विश्वचषकाच्या आयोजकांकडून मोठी चूक

भारताच्या ध्वजावरून अशोक चक्र गायब, महिला हॉकी विश्वचषकाच्या आयोजकांकडून मोठी चूक

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेला काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतासहीत सर्व संघ लंडनमध्ये दाखल झाले आहेत. स्पर्धेपूर्वी विविध संघाच्या कर्णधारांचे एक फोटोशूट करण्यात आले. त्यावेळी भारताच्या झेंड्यामधून अशोक चक्र गायब करण्याची घोडचूक आयोजकांनी केल्याचे समोर आले आहे. विश्वचषकापूर्वी थेम्स नदीच्या काठी सर्व कर्णधारांना फोटोशूटसाठी बोलावले होते. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more