Short News

विधानसभा निवडणुकीपूर्वी अहदनगर जिल्ह्याचे विभाजन

विधानसभा निवडणुकीपूर्वी अहदनगर जिल्ह्याचे विभाजन

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच, असे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी आज नाशिकमध्ये केले. यापूर्वी नगर जिल्ह्यात ३ सत्ताकेंद्र होती, त्यामुळे विभाजन होऊ शकले नाही. मात्र आता परिस्थिती अनुकूल आहे आणि मी एकटाच मंत्री असल्याने नगर जिल्ह्याचे विभाजन लवकरात लवकर होईल अशी माहिती राम शिंदे यांनी आज दिली.विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी हे विभाजन होईल असेही राम शिंदे म्हणाले आहेत. 
अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खान सध्या काविळने त्रस्त झाला आहे. त्याच्या या आजारामुळेच त्याच्या सिनेमांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले आहे. इरफानला द मिनस्ट्री या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पंजाबला जायचे होते. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर लगेच तो ब्लॅकमेल या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात करणार होता. पण आता काविळ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरी येथील धील ईशांत कंपाऊंडमधील एशियन केमिकल कंपनीला गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे.
जळगावात मानसिक तणावातून विवाहित तरुणाची आत्महत्या

जळगावात मानसिक तणावातून विवाहित तरुणाची आत्महत्या

मानसिक तणावामुळे एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात शहरात घडली. संदीप उत्तम राजपूत (२५) असे या तरुणाचे नाव आहे. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी येथील डोळ्यांच्या धर्मार्थ दवाखाना येथे असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. संदीप हा बुधवार पासून बेपत्ता होता. आज सकाळी त्याचा मृतदेह विहिरीत तंरगताना दिसला.