Short News

डीएसकेंची अटक टळली, आता सुनावणी २२ फेब्रुवारीला

डीएसकेंची अटक टळली, आता सुनावणी २२ फेब्रुवारीला

पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २२ फेब्रुवारीला निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे, त्यांच्यावरची अटकेची तलवार २२ फेब्रुवारीपर्यंत टळली आहे. डीएसकेंच्या खटल्यावर आजचा अंतिम युक्तीवाद संपला. मात्र आज पुन्हा डीएसके ५० कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरले. पैसै जमा झाले आहेत मात्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी डीएसकेंनी केली.
लोकसभा निवडणूक लढवण्याचे कैन्हयाने दिले संकेत

लोकसभा निवडणूक लढवण्याचे कैन्हयाने दिले संकेत

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी शहला रशीद आणि कन्हैया कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांनी कायमच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारला विरोध दर्शवला आहे. कन्हैया कुमार हा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता आहे. तर शहला रशीद ही जेएनयूतील पीएचडीची विद्यार्थीनी असून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची ची उपाध्यक्ष होती. 
बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक

बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी बहुदेशीय व्यापाराची पुर्नरचना करण्यासाठी अमेरिकेला मदतीचे आवाहन केले. बहुदेशीय व्यापार ही संकल्पना निर्माण करण्यात अमेरिकेची निर्णायक भूमिका राहिलेली आहे, असे ते म्हणाले. युएस काँग्रेसच्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. 'बहुदेशीय व्यापार' या संकल्पनेला प्रत्यक्षात अमेरिकेने आकार दिल्याचे ते म्हणाले. 
सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी आपल्या ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. 'यासिर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसहूद अझहर याचा उजवा हात मानला जायचा.