Short News

जीव देण्यापेक्षा आमच्या जमिनी द्या, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेंना पत्र

जीव देण्यापेक्षा आमच्या जमिनी द्या, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेंना पत्र

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाला जाहीर आव्हान दिले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी लढताना प्राण पणाला लावण्याची घोषणा केली. यानंतर एका शेतकऱ्यांने त्यांना पत्र लिहिले. जीव देण्याऐवजी पूस येथील साखर कारखान्यात गेलेल्या जमिनी परत द्याव्या, असे म्हटले.
टी20 लीग : मुंबईचा 11 धावांनी दणदणीत पराभव

टी20 लीग : मुंबईचा 11 धावांनी दणदणीत पराभव

मुंबईसाठी महत्त्वाचा असलेल्या सामन्यात हिट मॅनचा संघाचा दणदणीत पराभव झाला. या पराभवासह मुंबईच्या बाद फेरीत जाण्याची संधीही मुंबईने गमावली आहे. दिल्लीने दिलेल्या पराभवाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाच्या नाकीनऊ लागले. दिल्लीच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे नामी फलंदाजींनी नांगी टाकली. मुंबईचा पूर्ण संघ 163 धावांवर गारद झाला. कर्णधार रोहित शर्माही या सामन्यातही निराशाजनक फलंदाजी केली. 
तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या 3 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावात ही दुर्घटना घडली. सोमित्रा सातपुते (वय 12 वर्षे), संगीता रणमळे (वय 15 वर्षे) आणि जना रणमळे (वय 18 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. 6 मुली आज सकाळच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. 
शाओमी रेडमी नोट 4 च्या किमतीत मोठी सूट

शाओमी रेडमी नोट 4 च्या किमतीत मोठी सूट

कमी किंमतीत अत्यंत उपयोगी स्मार्टफोन विकत घेण्याची संधी शाओमी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. शाओमी रेडमी नोट 4 वर सूट मिळत आहे. याबद्दल माहिती शाओमी इंडियाचे प्रमुख आणि शाओमीचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा स्मार्टफोन 11,999 रुपयांत खरेदी करू शकतात. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये होती.