Short News

पालघरमधील दुमजली विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग

पालघरमधील दुमजली विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग

डहाणू तालुक्यातील कासामधील दुमजली विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्या सहा जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र अजूनही एक जण आगीत अडकल्याची भीती आहे. पहाटे तीनच्या सुमारास लागलेली आग अजूनही भडकत आहे. अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे.
इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन

इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन

गरमागरम आणि खमंग समोसा आता इंग्लंडवासीयांची भूक भागवणार आहे. भारतीय लोकांचा आवडता असणारा हा समोसा, आता इंग्लंडमध्ये दिसणार आहे. इंग्लंडच्या लेस्टर शहरात समोसा वीक साजरा केला जाणार आहे. 9 ते 13 एप्रिल दरम्यान इंग्लंडमधल्या खवय्यांना या समोशाचा आस्वाद घेता येणार आहे. दक्षिण आशियातल्या खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या समोसा वीकचं आयोजन करण्यात आलंय.
फ्रान्सच्या सुपरमार्केटमध्ये बंदुकधाऱ्यांनी नागरिकांना ठेवले ओलीस

फ्रान्सच्या सुपरमार्केटमध्ये बंदुकधाऱ्यांनी नागरिकांना ठेवले ओलीस

फ्रान्समधील ट्रीबीस येथील सुपर मार्केटमध्ये आठ जणांना बंधक बनवण्यात आले आहे. नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या हल्लेखोराने पोलिसांवर गोळीबारही केला आहे. हल्लेखोराने आपण इसिसशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. बीएफएम टीव्हीने आपल्या वृत्तात असे म्हटले आहे. दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी पोहोचले असून ते परिस्थिती हाताळत आहे असे फ्रान्स सरकारकडून सांगण्यात आले आहे.
अरविंद केजरीवालांना दिलासा, आपच्या २० अपात्र आमदारांना न्यायालयाने ठरवले पात्र

अरविंद केजरीवालांना दिलासा, आपच्या २० अपात्र आमदारांना न्यायालयाने ठरवले पात्र

निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेल्या आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय नाकारत, या आमदारांचं म्हणणं पुन्हा एकदा ऐकण्याचे आदेश दिले आहेत. आपने आपल्या आमदारांना सचिवपद बहाल केलं होतं. मात्र ही लाभाची पदं असल्याचं कारण देत, निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींच्या मंजुरीने या आमदारांचं सदस्यत्वच रद्द केलं होतं.