Short News

मला पंतप्रधान व्हायचे नाही : नितीन गडकरी

मला पंतप्रधान व्हायचे नाही : नितीन गडकरी

राजकीय आयुष्यात मला माझ्या योग्यतेपेक्षा खूप अधिक मिळाले आहे. त्यामुळे मी . पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही,असे केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.मोदी सरकारला 4 वर्षंपूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते.मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. मंत्री म्हणून आपण खूप समाधानी असल्याचे गडकरी म्हणाले.
जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलकांचा आवाज घुमणार, बंदी हटवली

जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलकांचा आवाज घुमणार, बंदी हटवली

दिल्लीतील जंतर-मंतरवर आता पुन्हा एकदा आंदोलकांच्या घोषणा घुमताना दिसतील. सर्वोच्च न्यायालयाने जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास लादण्यात आलेली बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आंदोलन करण्यास कोणत्याही संघटनेला रोखता येणार नाही. जंतर-मंतर आणि बोट क्लबवरील आंदोलनास असलेली बंदी हटवण्यात आली असल्याचे सांगत न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नवीन मार्गदर्शिका तयार करण्यास सांगितले आहे. 
औरंगाबादेतील कचरा प्रश्न साफ झाल्यानंतरच लोकसभेत  जा; खैरेंना आदेश

औरंगाबादेतील कचरा प्रश्न साफ झाल्यानंतरच लोकसभेत जा; खैरेंना आदेश

जोपर्यंत कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लोकसभेत जाऊ नका,असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे लोकसभेत गेलो नाही असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विभागीय आयुक्तालयात आयोजित बैठकीत सांगितले. कचरा प्रश्नावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक बोलावली असून आमदार संजय शिरसाट आणि यांनी विभागीय आयुक्तांना खडेबोल सुनावले. 
बुराडी सामूहिक आत्महत्या : भाटीया कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू

बुराडी सामूहिक आत्महत्या : भाटीया कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीच्या बुराडीमध्ये ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येनंतर आता कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मृत्यूनंतर पाळीव कुत्रा टॉमी याला ‘हाउस ऑफ स्ट्रे एनिमल्स' (HSA) येथे ठेवण्यात आले होते. येथे त्याची देखभाल केली जात होती. मात्र, रविवारी संध्याकाळी जवळपास ७ वाजेच्या दरम्यान टॉमीचा मृत्यू झाला.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more