Short News

अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला

अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला

आपल्या गर्लफ्रेंडला मारहाण केल्यानंतर पळून गेलेल्या अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यातून पोलिसांनी अटक केली. त्याने जामीनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे अरमानला २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. अरमान कोहली याने गर्लफ्रेंड नीरु रंधवा हिला मारहाण केली. सांताक्रूज पोलिसांनी मंगळवारी त्याला लोणावळ्यातून अटक केली होती. 
गणपती बाप्पाला ‘इम्पोर्टेड गॉड’ म्हणणाऱ्या दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

गणपती बाप्पाला ‘इम्पोर्टेड गॉड’ म्हणणाऱ्या दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

गणपती बाप्पा हा इम्पोर्टेड आहे असे म्हणणाऱ्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामिळ सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक पी. भारतीराजा यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते. याच प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू मक्कल मुन्नानी या संघटनेने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या प्रकरणी पी. भारतीराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली.
सलमानने मानले चाहत्यांचे आभार

सलमानने मानले चाहत्यांचे आभार

‘रेस ३' हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल यासारख्या कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे या चित्रपटाने केवळ पहिल्या दोन दिवसांमध्येच २७.६९कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रेक्षकांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता सलमाननेही चाहत्यांचे आभार मानले आहेत.
एक नवरदेव तीन वधू; एकाच मंडपात घेतले फेरे

एक नवरदेव तीन वधू; एकाच मंडपात घेतले फेरे

उदयपूर जिल्ह्यात एक विचित्र लग्नसोहळा पहायला मिळाला. ज्या लग्नात एक वर तर तीन वधू होत्या. मोठ्या साजशृंगारांनी सजलेल्या तिन्ही वधूंनी एकाच नवरदेवासोबत मोठ्या उत्साहाने फेरे घेत आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. विशेष म्हणजे हे लग्न एकाच मंडपाखाली एकाच वळी पार पडले. या विवाह प्रकरणातील माहिती अशी की, नवरेदव आणि वधू असलेल्या तिन्ही तरूणी गेली अनेक वर्षे लिव्ह-ईन रिलेशनशिपमध्ये राहतात.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more