Short News

दुसऱ्या दिवशीही मराठवाड्यात गारपीटीचा कहर कायम

दुसऱ्या दिवशीही मराठवाड्यात गारपीटीचा कहर कायम

सलग दुसऱ्या दिवशीही मराठवाड्यात गारपीटीचा कहर सुरूच आहे. रविवारी जालना, परभणी, लातूर जिल्ह्यात तुफान गारपीट झाल्यानंतर सोमवारीही (१२ फेब्रुवारी) तब्बल ७०७ गावांना गारपीटीचा फटका बसला. बाधित गावांमध्ये सर्वाधिक ३२७ गावे नांदेड जिल्ह्यातील असून लातूर जिल्ह्यातील २११ गावांना गारपीटीचा सामना करावा लागला. दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातील तब्बल ६९ हजार ७१६ हेक्टर पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक

बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी बहुदेशीय व्यापाराची पुर्नरचना करण्यासाठी अमेरिकेला मदतीचे आवाहन केले. बहुदेशीय व्यापार ही संकल्पना निर्माण करण्यात अमेरिकेची निर्णायक भूमिका राहिलेली आहे, असे ते म्हणाले. युएस काँग्रेसच्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. 'बहुदेशीय व्यापार' या संकल्पनेला प्रत्यक्षात अमेरिकेने आकार दिल्याचे ते म्हणाले. 
सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

सुरक्षा दलाच्या जवानांकडून मुफ्ती यासिरला कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी आपल्या ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. 'यासिर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसहूद अझहर याचा उजवा हात मानला जायचा.  
दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन पहिले नेते

दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन पहिले नेते

उद्या आशिया आणि पर्यायाने जागतिक शांततेच्या दिशेने नवे पाऊल टाकणार आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची अणूकार्यक्रमासह इतर अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. 1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उ.कोरियन नेते असतील. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि  किम यांची सकाळी स्थानिकवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता भेट होणार आहे.